खासदार आत्या सुप्रिया सुळेंनी ‘जोडीचे’ फोटो शेअर केले! अजित पवार यांच्या धाकट्या लेकाचं लग्न ठरलं….

0
1

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. जय यांच्या आत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोडीचे फोटो शेअर केले आहेत. नव्या जोडीने शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले.

अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे राजकारणापासून काहीसे बाजूला आहेत. परंतु राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी स्थानिक राजकारणात जातीने लक्ष घालायला सुरुवात केली. त्यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार यांनी लोकसभा लढवली तसेच पाठोपाठ राज्यसभेवर त्यांची निवड झाल्याने बारामतीमधील जनतेचे प्रश्न जाणून घेण्याकरिता जय पवार यांना नाईलाजास्तव का होईना, पण राजकारणात पाऊल ठेवावे लागले.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

उद्योग क्षेत्रात जय पवार यांना विशेष गती आहे. काही वर्षे दुबईत त्यांनी व्यवसाय केल्याचे सांगितले जाते. परंतु गेले काही वर्षे ते मुंबई आणि बारामतीतच असतात. सध्याही ते व्यवसाय सांभाळत असल्याचे सांगितले जाते.

सुप्रिया सुळेंकडून ‘जोडीचे’ फोटो शेअर

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर कुटुंबातही काहीसा दुरावा आलेले होता. परंतु आनंदाच्या क्षणी सगळे रुसवे फुगवे, मतभेद बाजूला ठेवून पवार कुटुंब एकत्र येण्याची परंपरा आहे. आताही जय पवार यांचे लग्न ठरलेले असताना नवी जोडी आजोबा शरद पवार आणि आजी प्रतिभा पवार यांचे आशीर्वाद घेण्याकरिता त्यांच्या निवासस्थानी गेली. दोघांनीही आजी-आजोबांचे आशीर्वाद घेतले.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

जय आणि ऋतुजा तुम्हा दोघांचेही खूप खूप अभिनंदन… आनंदी राहा, तुम्हाला खूप खूप आशीर्वाद असे कॅप्शन लिहित खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंबासमवेतची काही खास क्षणचित्रे शेअर केली आहेत. लवकरच दोघांचा साखरपुडा समारंभ होणार असल्याचे कळते.

जय पवार यांच्याबद्दल माहिती, कोण आहेत जय पवार?

-पार्थ पवार हे अजित पवार यांचे थोरले चिरंजीव तर जय पवार हे धाकटे चिरंजीव

-जय पवार यांना सुरुवातीच्या काळात राजकारणात फारसा रस नव्हता

-उद्योग व्यवसायाकडे त्यांचा कल होता, दुबईत काही वर्षे त्यांनी व्यवसाय केला

-परंतु घरातच राजकारण असल्याने तसेच आई-वडील दोघेही लोकप्रतिनिधी असल्याने सामान्यांच्या प्रश्नांची -सोडवणूक करण्याकरिता ते ही राजकारणात आले

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

-बारामतीमधील स्थानिक प्रश्नांमध्ये जय पवार आवर्जून लक्ष देतात

-कमी पण नेमके आणि गरजेचे बोलणे ही जय पवार यांच्या स्वभावाची खासियत