पुण्यातील घटनेचा सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यातील स्वारगेट बस डेपोत तरुणीवरील अत्याचार झाल्याच्या घटनेने पोलिसांनी तातडीने कारवाई करायला सुरुवात केली आहे. पोलिसांचे पथके आरोपीच्या मागावर आहेत. आरोपी दत्ता गाडे फरार आहे. पुणे पोलिसांचे पथके त्याच्या शोधावर आहे. पोलिसांनी कारवाईदरम्यान शिवशाहीच्या बसच्या एसटी ड्रायव्हरचा जबाब हाती आला आहे.






पुण्यातील स्वारगेट बस डेपोतील त्या शिवशाही एसटी ड्रायव्हरचा जबाब साम टीव्हीच्या हाती आला आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील ‘त्या’ एसटी बस चालकाने वरिष्ठांना सुपूर्द जबाब केला. मी त्या बसचा वाहक आहे, असं सांगून आरोपीने तरुणीवर अत्याचार केल्याचं चालकाने सांगितलं. स्वारगेट ते सोलापूर एसटी बस विनावाहक (कंडक्टर) होती. त्यानंतर मंगळवारी पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी एसटी बस स्वारगेट आगारात पोहोचली होती. या बस चालकाने बस स्वारगेट बस स्थानकात रसवंतीगृहासमोर पुढे उभी केली.
बस चालकाने काय जबाब दिला?
बसचालकाने जबाबात म्हटलं की, सकाळी ६ वाजेदरम्यान मी बसचा वाहक आहे, असे सांगून एका प्रवासी महिलेला एका अज्ञात प्रवाशाने बसमध्ये घेऊन गेले. त्यानंतर त्यांच्यासोबत जबरदस्ती केली, असे जबाबात नमूद करण्यात आलं आहे.
दरम्यान, शिवशाही बस अत्याचार प्रकरणात स्वारगेटच्या एसटी डेपो व्यवस्थापनामधील काही जणांची चौकशी होण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. व्यवस्थापन कार्यालयात पहाटे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी देखील होण्याची शक्यता आहे. तसेच स्वारगेट डेपोमध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांची सुद्धा पोलीस चौकशी होण्याची शक्यता आहे.










