पाकिस्तानचं डोकं फिरलंय! म्हणे हा भारताचा जादूटोणा?११ खेळाडूंसाठी २२ मांत्रिक; चर्चेचा VIDEO व्हायरल

0

आयसीसी चॅम्पियन्स ट्ऱॉफीत रविवारी हाय व्हॉल्टेज सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजयाची नोंद केली. या पराभवामुळे यजमान पाकिस्तानचा संघ दुसऱ्याच सामन्यानंतर स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या सामन्यानंतर पाकिस्तानचा सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग जवळजवळ बंद झाला आहे. या विजयानंतर संपूर्ण भारतात एकच जल्लोष दिसून आला. भारती फॅन्स फटाके फोडून जल्लोष साजरा करताना दिसून आले.

तर तर दुसरीकडे पाकिस्तानचे फॅन्स निराश दिसून आले. पाकिस्तानच्या पराभवानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात काही लोकं पाकिस्तानच्या पराभवाबाबत चर्चा करताना दिसून येत आहेत. दरम्यान एका व्यक्तीने तर भारतीय संघ जादूटोणा करुन जिंकले आहेत, असा आरोप केला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

https://x.com/RatishShivam/status/1893904078154920198?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1893904078154920198%7Ctwgr%5E372fd8f70c15cce1a3f925e85942d75025f26ba1%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही लोकं एका पॉडकास्टमध्ये भारत- पाकिस्तान सामन्याबाबत चर्चा करताना दिसून येत आहेत. एक व्यक्ती म्हणाला, भारतीय संघ जिंकावा म्हणून या संघाने २२ मांत्रिक दुबईत पाठवले होते. या व्यक्तीने असा दावा केलाय की, पाकिस्तानच्या प्रत्येक खेळाडूसाठी २ भटजी पाठवण्यात आले होते, जे खेळाडूंसाठी जादूटोणा करत होते.