तू साराला डेट करतोय का? गिलने अखेर सांगूनच टाकलं; गिलच्या बहिणीसोबत एकाच कारमध्ये हा व्हिडिओ पुन्हा होतोय व्हायरल…

0
  1. भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल आपल्या फलंदाजीमुळे नेहमीच चर्चेत असतो. इंग्लंड विरुद्ध झालेल्या वनडे मालिकेपासून त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मैदानातील कामगिरीसह गिल आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असतो. अनेक माध्यमातील वृत्तांमध्ये, शुभमन गिलचं नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत जोडलं गेलं आहे. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात गिलला सारा तेंडुलकरबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना गिल काय म्हणाला? जाणून घ्या.

व्हिडिओ होतोय व्हायरल –

https://x.com/Anshika_in/status/1894276947527753892?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1894276947527753892%7Ctwgr%5Eb34d9648d8a5335019024061d4b207527ba86dfd%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

गिल सध्या भारतीय संघासोबत दुबईत आहे. आपल्या शानदार फलंदाजीमुळे त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ आताचा नसून जुना आहे. मात्र तो ट्रेंड करत असल्याने हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये होस्ट गिलला विचारते, तू साराला डेट करतोय का? यावर उत्तर देताना गिल म्हणतो, ‘ कदाचित..’

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरचं नाव खूप आधीपासून जोडलं जात आहे. दोघांचे काही फोटो देखील व्हायरल झाले होते. मात्र दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सारा तेंडुलकर अनेकदा भारताचा सामना पाहण्यासाठी आली आहे. यासह काही महिन्यांपूर्वी ती शुभमन गिलच्या बहिणीसोबत एकाच कारमध्ये दिसून आली होती.