तू नीच, गलिच्छ माणूस आहेस; रोहित शर्माला वजनावरुन ट्रोल करणाऱ्याला जावेद अख्तरांचे चोख उत्तर

0
1

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर हे कायमच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफाइनल सामन्यात विराट कोहलीने केलेल्या कामगिरीचे कौतुक करत पोस्ट शेअर केली होती. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या. मात्र, रोहित शर्माला जाड म्हणाऱ्या एका यूजरची कमेंट पाहून जावेद अख्तर यांनी राग व्यक्त केला आहे. त्यांनी यूजरला चांगलेच सुनावले आहे.

जावेद अख्तर यांनी विराट कोहली आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजयासाठी टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर, “पुन्हा एकदा विराटने हे सिद्ध केले आहे की तो आजच्या भारतीय क्रिकेट भवनचा सर्वात मजबूत आधारस्तंभ आहे !!! शुभेच्छा” या आशयाची पोस्ट लिहिली होती. त्यावर काही नेटकऱ्यांनी कमेंट करत आनंद व्यक्त केला होता. तर एका नेटकऱ्याने कमेंट करत, “जर विराट सर्वात मजबूत आधारस्तंभ असेल तर रोहित शर्मा कोण आहे? सर्वात वजनदार स्तंभ? भारतीय कॅप्टन वजनदार पाहताना जावेद सर तुम्हाला लाज वाटली पाहिजे” असे म्हटले होते. ही कमेंट पाहून जावेद अख्तर यांना राग अनावर झाला आहे.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

जावेद अख्तर यांनी यूजरला उत्तर देत, “तुझे तोंड बंद कर, तू झुरळ आहेस. मी रोहित शर्मा आणि कसोटीच्या इतिहासातील सर्व महान भारतीय क्रिकेटर्सचा आदर करतो. रोहितसारख्या महान खेळाडूच्या सन्मानाविरूद्ध मी कधी बोललो आहे? तू इतका नीच आणि गलिच्छ माणूस आहेस जो मी कधीही न केलेला दावा माझ्यावर बळजबरी लादत आहे. आणि त्यावर बोलून तू तुझा वेळ वाया घालवत आहेस” असे म्हटले.

यापूर्वी काँग्रेस नेता शमा मोहम्मद यांनी भारतीय कॅप्टन रोहित शर्माने वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. तेव्हापासून रोहित शर्माच्या वजनाची चर्चा सुरु झाली. “रोहित शर्मा हा एक खेळाडू म्हणून जास्त जाड आहे. त्याला वजन कमी करण्याची गरज आहे आणि अर्थातच तो आतापर्यंतचा सर्वात मूळ कर्णधार आहे. त्याच्या इतर खेळाडूंच्या तुलनेत काय आहे? तो सरासरी कर्णधार तसेच सरासरी खेळाडू आहे ज्याला भारताचा कर्णधार होण्याचा बहुमान मिळाला आहे” या आशयाची पोस्ट शमा यांनी केली होती.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर