लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेत आता ५० लाख महिलांचे अर्ज बाद होणार आहे. सरकार ५० लाख महिलांचे अर्ज अपात्र करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर ९ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. आता सत्तेनंतर ९ लाख महिलांचे पैसे बंद होणार आहेत. यामुळे सरकारचे १,६२० कोटी रुपये वाचले आहेत.लाडकी बहीण योजनेनुळे ३६०० कोटींचा भार महिलांवर पडत आहे. या योजनेत जानेवारीत ५ लाख महिला तर फेब्रुवारीत ४ लाख महिलांना अपात्र केले आहे. यानंतर आता ५० लाख महिलांचे अर्ज बाद करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.