ठाकरे गटात एका पदासाठी दोन मर्सिडीज कार द्याव्या लागतात, असा खळबळजनक आरोप शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला होता. हे विधान मात्र त्यांच्या अंगलट आले आहे. नेत्या नीलम गोऱ्हे या विधानामुळे अडचणीत सापडल्या आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. सुषमा अंधारे गोऱ्हेंविरोधात अब्रु नुकसानीचा दावा करणार आहेत.
गोऱ्हे यांनी त्यांच्या कामाची सुरुवात करताना एसएफआयमधून केली, नंतर भारिपमध्ये उडी मारली. त्यांना प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे ओळख मिळाली. नंतर त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी बेईमानी केली. त्यांनी शरद पवारांच्या पक्षाशी बेईमानी केली मग त्या आमच्याकडे आल्या. त्या जिथे राहतात त्यांनी एक शाखा उभी केली नाही, लोकांना कसे बाजूला ठेवता येईल हेच त्यांनी केलं, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. त्यांनी २०१७ ते २०२२ पर्यंत माझा ठाकरे पक्षात प्रवेश होऊ दिला नाही, असा आरोपही सुषमा अंधारेंनी केला.
नीलम गोऱ्हेंच्या शब्दकोशात प्रामाणिकपणा हा शब्द नाहीय. नीलम गोऱ्हेंना ज्या पक्षांनी चारवेळा आमदारकी दिली. गोऱ्हेंनी त्यांच्या मॉडेल कॉलनीतील भागात शिवसेनेची एक शाखाही उघडली नाही. त्यांनी पक्ष संघटनेसाठी कोणतं काम केलं नाही,असं सुषमा अंधारे म्हणाल्या. गोऱ्हेंनी त्यांनी माझा शिवसेनेत पक्षप्रवेश होऊ दिला नाही. माझा पक्षप्रवेश होईपर्यंत नीलम गोऱ्हेंच्या कानावर पडू दिलं नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
नीलम गोऱ्हे ह्या पक्षात कोणाला वाढू देत नाहीत. पक्षात कुणाला प्रवेश द्यायचा नाही द्यायचा हे सगळं काम नीलम गोऱ्हे बघत. आमदारकीसाठी मर्सिडीज दिल्या तर त्या नीलम गोऱ्हेंनी कुठून आणल्या? व्यवसाय काय, की त्यांची अडीचशे कोटींची संपत्ती आहे? असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय. एकनाथ शिंदे आणि नीलम गोऱ्हे यांनाच माहिती असेल की कारचं कलेक्शन किती होतं. नीलम गोऱ्हे यांनी त्यांचे म्हणणे कोर्टात सादर करावे, नाहीतर नाक घासून माफी मागितली तरी आमचा लढा चालू असणार , असंही सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं.