सुरेश धसांची धनंजय मुंडेंच्या परळी मतदारसंघात एंट्री अन् पोरांनी ताफा अडवला, अन् थेट दगडं उचलली

0

भाजपचे आमदार सुरेश धस हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात पोहोचले आहे. ज्यांच्यावर आरोप केले, त्यांच्याच मतदारसंघात धस यांनी एंट्री केल्यामुळे मुंडे समर्थकांनी कडाडून विरोध केला. काही ठिकाणी धस यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्याचाही प्रयत्न झाला. पण पोलिसांनी वेळीच अडवला.

आमदार सुरेश धस हे महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी परळीमध्ये आले होते. त्यानंतर त्यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय मुंडे यांची भेट घेतली. त्यानंतर शिरसाळा इथं पोहोचले असता पुन्हा एकदा सुरेश धस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. आंदोलकांनी सुरेश धस यांचा ताफा अडवून जोरदार विरोध केला.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

सुरेश धस यांच्या विरोधात ताफ्यासमोरच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आंदोलक आणि धस समर्थक आमने सामने आले होते. परळीत विरोध झाल्यानंतर मुंडेंच्या मतदारसंघात आंदोलक आक्रमक झाले होते. सुरेश धस यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्याचाही प्रयत्न झाला होता मात्र पोलिसांनी वेळीच पकडल्याने पुढील अनर्थ टळला.

दरम्यान, आज सकाळी सुद्धा सुरेश धस यांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या मुंडे समर्थक आणि कराड समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरेश धस परळीची बदनामी करत असल्याचा आरोप मुंडे समर्थकांनी केला होता. सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी करण्यात आली होती. घोषणाबाजीनंतर काही काळ परळीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घोषणाबाजी करणाऱ्या मुंडे समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

गुंतवणूकदारांच्या पाच हजार कोटींच्या अर्थकारणासाठी परळी दौरा

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधल्या सोळा लाख ठेवीदारांचा आणि पाच हजार कोटी रुपयांचा प्रश्न आहे. त्यातील दीड लाखापेक्षा जास्त ठेवीदार बीड जिल्ह्यातील आहे. तीनशे कोटींपैकी 250 कोटी परळी शहरातील आहेत. तसेच कर्ज वाटपसुद्धा परळी तालुक्यातील आहे. कोटीचे कर्ज उचलणारेच फडके (झेंडे) दाखवायला आले असतील. जवळपास वीस हजार लोकांचे पैसे अडकले आहेत, असे सुरेश धस यांनी सांगितले.

सुरेश धस-धनंजय मुंडे यांच्या भेटीमागचे राजकारण

मागील आठवड्यात सुरेश धस यांनी गुप्तपणे धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. दोन महिने आरोप केल्यानंतर सुरेश धस धनंजय मुंडे यांना बंद दरवाजाआड भेटूच कसे शकतात, असा प्रश्न विचारात अनेकांनी त्यांच्या विश्वार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर मात्र बावनकुळे यांच्या घरी आम्ही भेटलो तसेच ते आजारी असल्याने त्यांची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतली, असे सुरेश धस यांनी सांगितले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा