चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात करो या मरोची लढाई, असं असेल भारताचं गणित

0
2

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी झाले आहेत. आठ संघांची दोन गटात वर्गवारी करण्यात आली असून प्रत्येक संघ साखळी फेरीत तीन सामने खेळणार आहे. त्यामुळे उपांत्य फेरी गाठायची असेल तर तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे. भारताच्या गटात पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांग्लादेश हे संघ आहेत. भारताचे सर्व सामने दुबईत होणार असून पहिलाच सामना बांगलादेशशी होणार आहे. भारताचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेशशी होणार आहे. हा सामना भारतासाठी करो या मरोची लढाई असणार आहे. कारण या गटातील सर्वात दुबळा संघ म्हणून बांगलादेशकडे पाहिलं जात आहे. पण बांगलादेशने अनेकदा स्पर्धेत उलटफेर केला आहे. 2007 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत याची अनुभूती आली आहे. त्यामुळे भारताने बांगलादेशला क्रिकेटच्या मैदानात कमी लेखणं महागात पडू शकतं. भारताला उपांत्य फेरी गाठायची तर पहिल्याच सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. कारण त्यानंतर पाकिस्तान आणि न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. या दोन संघांना सहज पराभूत करू अशी स्थिती नाही. त्यामुळे पहिल्याच सामन्यात भारताचं उपांत्य फेरीबाबत काय तो फैसला होणार आहे.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली

भारताने पहिल्याच सामन्यात विजय मिळवला तर उर्वरित दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवलं तरी पुरेसं होईल. पण पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं तर मात्र भारताला उर्वरित दोन्ही सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागेल. अन्यथा उपांत्य फेरीचं गणित सुटणार नाही. पहिला सामना गमवल्यानंतर भारताला उर्वरित दोन सामन्यात विजयाचं दडपण असेल. दडपणाखाली चांगला प्रदर्शन करणं कठीण होईल. त्यात न्यूझीलंडने आयसीसी स्पर्धांमध्ये भारताची वाट कायम अडवली आहे. साखळी फेरीत भारताचा पहिला सामना बांगलादेशशी 20 फेब्रुवारीला, दुसरा सामना पाकिस्तानशी 23 फेब्रुवारीला आणि तिसरा सामना न्यूझीलंडशी 2 मार्चला होणार आहे.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.