टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतो. मात्र सचिन गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फार चर्चेत आहे. सचिनने काही दिवसांपूर्वी त्याचे गुरु आणि अनेक क्रिकेटपटू घडणावेक महान कोच रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारकाचं अनावरण केलं. त्यानंतर त्याची लेक सारा तेंडुलकर हीची एसटीएफ अर्थात सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या संचालकपदी नियुक्त केल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता सचिनची आणखी एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाली आहे.






सिंधू लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. पीव्ही सिंधू वेंकट दत्त साई याच्यासह विवाहबद्ध होणार आहे. दोघांचा विवाह 22 डिसेंबरला होणार आहे. सिंधू आणि साई दोघेही सचिनला लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी घरी आले होते. त्यानंतर सचिनने स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि वेंकट दत्त साई यांच्यासोबतचा फोटो एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन पोस्ट केला आहे. लग्नाच्या आमंत्रणानंतर सचिनने एक फोटो पोस्ट करत सिंधूला शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनची पोस्ट व्हायरल झाली आहे.
बॅडमिंटन या खेळातील स्कोअरची सुरुवात कायम ‘लव्ह’ने होते. सिंधू तुझा व्यंक्ट दत्ता साई यासोबतचा प्रवास प्रेमाने बहरलेला असेल. तुमच्या जीवनातील महत्त्वाच्या क्षणी उपस्थितीत राहण्यासाठी आमंत्रण दिलंत, त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. तुमच्या आयुष्यातील नव्या प्रवासची आठवण आणि आनंदाची रॅली पाहायला मिळोत”, अशी खास पोस्ट सचिनने सिंधूसाठी केली.











