हार्दिकच्या नेतृत्वात मुंबईची पराभवाची अन् राजस्थानची विजयी ‘हॅटट्रिक’ ; कर्णधार बदलण्याची मोठी शक्यताही

0

आयपीएल 2024 चा चौदावा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला आहे. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली. 20 षटकांत 9 गडी गमावून संघाला केवळ 125 धावा करता आल्या. कर्णधार हार्दिक पंड्याने सर्वाधिक 34 धावा केल्या. मुंबई संघाची हार्दिक पांडे यांच्याकडे सूत्रे गेल्यापासून संघाची कामगिरी समाधानकारक नसल्यामुळे अनुभवी रोहित शर्मा यांना पुन्हा कर्णधार करण्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू असतानाच सलग तिसऱ्या पराभवामुळे त्याला जोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्णधार पद नसतानाही मुंबई इंडियनच्या टीम मध्ये समन्वय राखण्याची भूमिका रोहित शर्मा आजही निभावत असल्यामुळे पुन्हा एकदा त्याच्याकडे त्यांना कर्णधार पद देऊन मुंबई इंडियन्सला पुन्हा आयपीएलमध्ये कमबॅक करण्यासाठी मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

संजूच्या राजस्थान रॉयल्सने सहा विकेट्स शिल्लक असताना पूर्ण केले. आणि आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आणि सहा गुणांसह गुणतालिकेत पहिले स्थान गाठले आहे. त्याचबरोबर मुंबईला या स्पर्धेत आतापर्यंत पहिला विजय मिळवता आलेला नाही आणि ती 10व्या स्थानावर आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

राजस्थानची पडली तिसरी विकेट, संजूपाठोपाठ बटलरही आऊट

राजस्थानला तिसरा धक्का बसला आहे, कर्णधार संजू सॅमसन पाठोपाठ जोस बटलर आऊट झाला आहे. राजस्थानचा कर्णधार संजू 12 धावा करून झाला. त्याला आकाश मधवालने आऊट केले. तर दुसऱ्याच षटकात तो आकाश मधवालने 13 धावांवर जोस बटलरला आऊट केले. विचंद्रन अश्विन पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे. त्याचवेळी रियान पराग चार धावा करून नाबाद खेळत आहे. सात षटकांनंतर संघाची धावसंख्या ५०/३ आहे.

राजस्थानला पहिला धक्का 10 धावांवर बसला आहे. क्विन माफाकाने पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर यशस्वी जैस्वालला बाद केले. त्याला केवळ 10 धावा करता आल्या. संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध मुंबई इंडियन्सचा संघ खूप फ्लॉप ठरला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघाने 20 षटकात 9 गडी गमावून 125 धावा केल्या आणि मुंबईसमोर 126 धावांचे माफक लक्ष्य ठेवले. या सामन्यात मुंबईच्या टॉप ऑर्डरची कामगिरी निराशाजनक होती. गेराल्ड कोएत्झीच्या रूपाने मुंबईला आठवा धक्का बसला. चहलने त्याला आऊट केले. त्याला केवळ चार धावा करता आल्या. सध्या टीम डेव्हिड आणि जसप्रीत बुमराह क्रीजवर आहेत. 17 षटकांनंतर संघाची धावसंख्या 112/8 आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

या सामन्यात मुंबईचा कणा म्हणून उभा राहिलेला तिलक वर्माही बाद झाला. युझवेंद्र चहलने त्याला आपला बळी बनवले. 29 चेंडूत 32 धावा करून युवा फलंदाज माघारी परतला. सध्या टीम डेव्हिड आणि जेराल्ड कोएत्झी क्रीजवर आहेत. 14 षटकांनंतर संघाची धावसंख्या 97/7 आहे.

या सामन्यात पहिल्या १० षटकात राजस्थान रॉयल्सचा दबदबा पाहिला मिळत आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या 34 धावांवर आऊट झाला. चहलने त्याची विकेट घेतली. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचे गोलंदाज धुमाकूळ घालताना दिसत आहेत. त्यामुळे मुंबईची हालत खराब झाली आहे. नांद्रे बर्जरने 29 धावांवर इशान किशनला बाद केले. या सामन्यात त्याला 16 धावा करता आल्या. हार्दिक पंड्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.

मुंबईचे ३ खेळाडू शुन्यावर तंबूत

ट्रेंट बोल्टने 14 धावांवर मुंबई इंडियन्सला तिसरा धक्का दिला. त्याने दुसऱ्याच षटकात डेव्हॉल्ड ब्रुईसलाही बाद केले. ब्रेव्हिसही गोल्डन डकचा बळी ठरला. तिलक वर्मा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आले आहेत. तीन षटकांनंतर संघाची धावसंख्या 16/3 आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

मुंबई इंडियन्सची सुरुवात धक्कादायक झाली आहे. रोहित शर्मा आणि नमन धीरला ट्रेंट बोल्टने दोघेही खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले. सध्या इशान किशन आणि डेवाल्ड ब्रेविस क्रीजवर आहेत.

दोन्ही संघाची Playing-11

मुंबई इंडियन्स : इशान किशन, रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह, क्वान माफाका.

राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल.

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संदीप शर्मा या सामन्यात खेळताना दिसणार नाही. त्यांच्या जागी नांद्रे बर्जर यांना संधी मिळाली आहे. तर मुंबई इंडियन्स कोणताही बदल न करता खेळताना दिसणार आहे.