श्रीलंकेचा पाकिस्तानवर थरारक विजय, फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध भिडणार

0

वूमन्स आशिया कप 2024 स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये श्रीलंकाने पाकिस्तानवर थरारक विजय मिळवला आहे. श्रीलंकेने पाकिस्तावर 3 विकेट्सने मात केली आहे. पाकिस्तानने विजयासाठी 141 धावांचं आव्हान दिलं होतं. श्रीलंकेने या धावांचा पाठलाग करताना जोरदार लढा दिला. तर दुसऱ्या बाजूने पाकिस्तानच्या गोलंदाजांनीही चिवट बॉलिंग केली. त्यामुळे सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत पोहचला. मात्र श्रीलंकेने 1 बॉल राखून विजय मिळवला. श्रीलंकेने 19.5 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 141 धावा केल्या. आता फायनलमध्ये श्रीलंकेचा सामना हा टीम इंडिया विरुद्ध होणार आहे. तर पराभवासह पाकिस्तानचा प्रवास इथेच संपला आहे.

श्रीलंकेची बॅटिंग

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

श्रीलंकेच्या विजयात कॅप्टन चमारी अथापथु हीने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. चमारीने 48 बॉलमध्ये 9 फोर आणि 1 सिक्ससह 63 रन्स केल्या. तर अनुष्का संजीवनी हीने 22 बॉलमध्ये नॉट आऊट 24 रन्स केल्या. संजीवनीनने शेवटपर्यंत नाबाद राहत विजयात मोलाची भूमिका बजावली. तर कविशा दिलहारी 17, हर्षिता समरविक्रमा 12 आणि सुगंदीका कुमारी हीने 10 धावा केल्या. दोघी आल्या तशाच गेल्या. तर इतरांना खास काही करता आलं नाही. पाकिस्तानकडून सादिया इक्बाल हीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर कॅप्टन नीदा दार आणि ओमैमा सोहाली या दोघींनी 1-1 विकेट घेतली.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

मेन्सनंतर वूमन्स फायनलमध्ये

दरम्यान आता 28 जुलै रोजी टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात आशिया कप ट्रॉफीसाठी महामुकाबला होणार आहे. दोन्ही संघ हे अजिंक्य आहेत. उभयसंघांनी साखळी फेरीतील 3 आणि सेमी फायनल असे एकूण 4 सामने जिंकले आहेत. तसेच 2023 च्या आशिया कप फायनलमध्ये मेन्स इंडिया-श्रीलंका आमनेसामने होते. त्यानंतर आता वूमन्स इंडिया-श्रीलंका असा महाअंतिम होणार आहे. आता टीम इंडिया फायनलमध्ये श्रीलंकेवर मात करुन मेन्स टीमप्रमाणे धमाका करणार? की वूमन्स श्रीलंका टीम इंडियाला पराभूत करत मेन्सच्या पराभवाचा वचपा घेणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

श्रीलंकेची फायनलमध्ये धडक

श्रीलंका वूमन्स प्लेइंग ईलेव्हन: चमारी अथापथु (कॅप्टन), विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, हसिनी परेरा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), कविशा दिलहारी, निलाक्षी डी सिल्वा, इनोशी प्रियदर्शनी, उदेशिका प्रबोधनी, सुगंधिका कुमारी आणि अचीनी कुलसूरिया.

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: निदा दार (कॅप्टन), गुल फिरोजा, मुनीबा अली (विकेटकीपर), सिद्रा अमीन, ओमामा सोहेल, आलिया रियाझ, फातिमा सना, तुबा हसन, सादिया इक्बाल, नशरा संधू आणि सय्यदा आरूब शाह.