या 7 महापालिकांची निवडणूक तात्काळ लागण्याची शक्यता; ‘मातोश्री’त दीड तास बैठक, डॅमेज कंट्रोलसाठी काय ठरलं? 

0

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे कोकणातील निकटवर्तीय नेते राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे यांचे आणखी एक कोकणातील जवळचे नेते भास्कर जाधव हे नाराज असल्याची चर्चा आहे. भास्कर जाधव यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु झाल्यानंतर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे भास्कर जाधव हे शिंदेंच्या शिवसेनेत जातील की काय? अशी चर्चा सुरु झाली. याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या गोटातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राजन साळवी यांच्यानंतर आता आणखी कोणता नेता सोडून जावू नये यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी आज महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

शिवसेनेची आज दीड तास बैठक पार पडली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अनिल परब, खासदार अनिल परब, संजय राऊत, माजी खासदार विनायक राऊत उपस्थित होते. पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची आहे. पक्षाची गळती रोखण्यासाठी ठाकरेंनी ही बैठक घेतल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर अंबादास दानवे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

अंबादास दानवे बैठकीनंतर काय म्हणाले?

“ही बैठक संघटनेच्या नियमित कामकाजांसाठी होती. कारण लोकसभा निवडणुका झाल्या, त्यानंतर विधानसभा निवडणुका देखील झाल्या आहेत. आमची सदस्य नोंदणी मोहीम सुरु झालेली आहे. यानंतर येणाऱ्या काळात राज्यात संघटनेचं काम मजबूत करण्यासाठी नेत्यांच्या टीमने कशाप्रकारे सक्रीय व्हावं, कशापद्धतीने संघटन व्हावं, या हेतून विचार करण्यासाठी आज संघटनात्मक बैठक होती”, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

दरम्यान, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये महापालिका निवडणुका होणार आहेत. मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांची घोषणा कधीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत ठाकरे गळाला पक्षगळती ही झेपणारी नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे हे ड्रॅमेज कंट्रोल करण्यात यशस्वी होतात का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.