महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आगामी काळामध्ये सर्व पक्षांना एकत्र घेऊन निष्पक्ष प्रगती कडे वाटचाल करत जाण्याचे संकेत दिले असतानाच काल मंत्री नितेशजी राणे यांनी एका कार्यक्रमामध्ये असे वक्तव्य केले की सरकारचा कोणता ही निधी हा फक्त्त महायुतीच्या कार्यकर्त्याला मिळेल. अशी वल्गना करत गरळ ओकली आहे. महाविकास आघाडीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला किंवा सरपंचला निधी मिळणार नाही. विकास होणार नाही. विकास करायचा असेल तर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करावा. असे निषेधार्य वक्तव्य करताना माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय त्यामुळे मला काही फरक पडत नाही. अशी पुष्टी देणे म्हणजे सध्या सत्ताधारी पक्षाचे धोरण असल्याची कुणकुण वाटत आहे. राष्ट्रवादी युवक शरदचंद्र पवार कोथरूड अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या वतीने कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये ठिक-ठिकाणी फलक लाऊन मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.






यावेळी गिरीश गुरनानी म्हणाले सत्ता येते जाते पण सत्तेचा ऐवढा माज कधी कोणी केला नाही. एखादा विरोधी पक्षाचा आमदार किंवा सरपंच स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी मंत्र्यांना निधी मागत नाही तो आपल्या गावाच्या किंवा विभागाच्या लोकांच्या विकासासाठी निधी मागत असतो. महाराष्ट्रात बहुसंख्य बहुमताची अनेक सरकारने सत्ताधारी झाली परंतु असले गलिच्छ राजकारण कधीही महाराष्ट्रात झाला नाही पण आज एक जवाबदार मंत्री भर सभेत असले वक्तव्य करतो हे नींदनीय आहे. आगामी काळातील वाटचाल योग्य दिशेने होण्यासाठी अशा वाचाळ वीरांना वेळीच आवर घालण्याची ही गरज निर्माण झाली आहे.











