अशुद्ध तेल शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज? देवस्थानने घेतला हा मोठा निर्णय; भाविकांची लूट होण्याची शक्यता

0

महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ शनि शिंगणापूर हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. हजारो भाविक शनिदेवाच्या दर्शनासाठी येतात. शनि देवाचा कोप होऊ नये म्हणून येथील शिळेवर तेल वाहण्याची प्रथा आहे.दररोज लाखो भाविक तेल अर्पण करतात. मात्र, अलीकडेच संस्थानाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय.. शनि शिंगणापूर येथील शनी देवाला तेल वाहताना आता फक्त शुद्ध तेलाचाच अभिषेक करावा, असा निर्णय़ विश्वस्त मंडळानं घेतलाय.

सुटं आणि मिश्रीत तेल भेसळयुक्त असतं. त्यामुळे शनिदेवाच्या शिळेवर परिणाम होऊन शिळेची झिज होत असते, असा अहवाल अन्न आणि भेसळ समितीनं दिलाय. त्यामुळे शुद्ध आणि ब्रँडेड तेलच शनी देवाला वाहण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाकडून घेण्यात आलाय….

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

ब्रँडेड तेलानेच शनिदेव प्रसन्न?

शनि शिंगणापुरात चौथऱ्यावर तैलाभिषेकाची परंपरा

शनिदेवाला सुट्या तेलाचा अभिषेक चालणार नाही

ब्रँडेड कंपनीचं, शुद्ध रिफायनरी खाद्यतेलच वापरणं बंधनकारक

तेलातल्या भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्याचा दावा

भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यास ते स्वीकारलं जाणार नाही.

दरम्यान, विश्वस समितीनं आणि भाविकांनी याबाबत काय प्रतिक्रीया दिलीये ते पाहूयात….

शनिदेवाच्या शीळेची झिज होऊ नये यासाठी हा निर्णय़ घेतला असला तरी ब्रँडेड आणि शुद्ध तेलाच्या नावाखाली बाजार मांडून भाविकांची लूट होणार नाही याची विश्वस्त आणि देवस्थानानं खबरदारी घेण्याची गरज आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा