पुणे डिजिटल मिडिया टीमने पालकमंत्री चंद्रकांतदादांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

0
2

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, सांसदीय कार्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या पुणे शाखेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

त्यांच्या कोथरुड येथील संपर्क कार्यालयात संपादक, राजकीय विश्लेषक,माध्यम तज्ज्ञ तथा संस्थापक अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना राजा माने, पुणे जिल्हा अध्यक्ष अजिंक्य स्वामी, नवनिर्वाचित शहराध्यक्ष महेश टेळे-पाटील, कार्याध्यक्ष विनायक बेदरकर यांनी श्री.विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती व “जायंट किलर” ही पुस्तके ख्यातनाम सिने निर्माता- दिग्दर्शक व “टीडीएम” या नव्याने प्रदर्शित झालेल्या त्यांच्या सिनेमामुळे चर्चेत असलेले भाऊराव कऱ्हाडे यांच्या उपस्थितीत भेट देवून सत्कार केला. संघटनेचे राज्य संघटक शामल खैरनार, सहसचिव केतन महामुनी,राज्य प्रतिनिधी माऊली म्हेत्रे,राज्य कार्यकारिणी सदस्य महेश कुगावकर,माझा भाऊ टेट्रा पॅक या मल्टि नॅशनल कंपनीचा अधिकारी भगवान माने, उदयोन्मुख अभिनेता अभय चव्हाण, कृषी निर्यात तज्ज्ञ अमोल पाटील, बालाजी राजपूत,मंदार चिकणे-पाटील आदी उपस्थित होतो.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ