राजाराम पूल ते वारजे हद्द नदीकाठ 36 मीटर रस्ता मार्ग मोकळा?; जागामालक अन् महापालिका अधिकारी बैठक यशस्वी संपन्न

0
1

कर्वेनगर भागातील राजाराम पूल ते वारजे हद्द नदीकाठ 36 मीटर रस्ता मागणी पूर्ण करण्यासाठी ऐतिहासिक सोसायटी ऐक्य केल्यानंतर दिलेल्या शब्दाप्रमाणे आज शिवणे खराडी रस्त्यामधील राजाराम पूल ते वारजे हद्द हा नदीकाठचा 36 मीटर रस्ता बाधित जागा मालकांची यशस्वी बैठक पुणे महापालिका पथविभाग उपायुक्त यांच्याकडे पार पडली आणि गेली तीस वर्ष प्रलंबित असलेला हा रस्ता पूर्ण होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. स्थानिक माजी नगरसेवक राजाभाऊ बराटे व ज्येष्ठ माजी नगरसेवक शिवराम पंत मेंगडे यांनी व्यक्तिशः लक्ष घालत हा विषय मार्गी लावण्याचा चंग धरला असल्याची चर्चा परिसरामध्ये सुरू आहे.

अधिक वाचा  कर्वेरोड सार्वजनिक गणेश विसर्जन नियमित वेळेतच; सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समितीचे बहुमूल्य योगदान

कर्वेनगर च्या मुख्य 100 फुटी डीपी रस्त्यावर दोन मार्च रोजी सकाळी सर्व सोसायटीतील नागरिकांनी मानवी साखळी करत या प्रश्नाचे गांभीर्य प्रशासनाला जाणून दिले. प्रशासकीय अधिकारी हेतू पुरस्कर याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी ही जाहीरपणे बोलण्यात आल्या होत्या. त्याच वेळी जागामालक आणि पुणे महापालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन पूर्ती आज पुणे महापालिकेच्या पतविभाग कार्यालयात झाली. यावेळी सविस्तर चर्चा करून संबंधित रस्ता त्वरित पूर्ण करण्यासाठी उपायुक्त पावस्कर यांनी मोलाचे सहकार्य केले असल्याचे स्थानिक नगरसेवक राजाभाऊ बराटे यांनी सांगितले.

पुणे महापालिकेच्या पत विभागामध्ये झालेल्या बैठकीमध्ये संबंधित जागा मालकांच्या संमतीने जागा ताब्यामध्ये घेऊन रुंदीकरण करून डांबरीकरण करण्याविषयी जागा मालकांनी संमती दिली आहे. त्यातच पथविभागाच्या वतीने पावसकर साहेब यांच्या सूचनेनुसार कर्वेनगर मधील सर्व बाधित जागामालक यांना हस्तांतरण करण्यासाठी एक खिडकीची योजना करण्याची ही तयारी दाखवली आहे.  स्थानिक नगरसेवक राजाभाऊ बराटे यांनी बोलवलेल्या या बैठकीला ज्येष्ठ माजी नगरसेवक शिवराम मेंगडेही उपस्थित होते.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे