“राज्यात मदरसे अतिरेक्यांचे अड्डे” बेकायदेशीरपणे सर्वकाही सुरु होतं..” मंत्री नितेश राणेंची खळबळजनक माहिती

0

“मदरसा शिक्षण संस्था आहेत की अतिरेकी घडवणारे अड्डे? तालिबान जे काही मोठं झालं, ते मोठं करणारे या मदरशांमध्ये तर जन्माला येत नाहीत ना? हा प्रश्न मला उपस्थित करायचा आहे. या मदरसाच्या निमित्ताने मी सरकारकडूनही पाठपुरावा करणार आहे की या मदरशांमध्ये नेमकं काय होतं? याचीही चौकशी करण्याचा पाठपुरावा मी स्वत: सरकारकडे करणार आहे. हे मदरसे शिक्षण देण्यासाठी आहेत की अतिरेक्यांना दूध पाजण्यासाठी आहेत? हे मदरसे अतिरेक्यांचे अड्डे तर झाले नाहीत ना? त्यांच्यामध्ये अतिरेक्यांना मोठं केलं जातं. त्यांना खतपाणी टाकलं जातं. देशविरोधी कामं करण्यासाठी या मदरशांचा वापर केला जातो. म्हणून राज्य सरकारकडून राज्यात असलेल्या सर्व मदरशांची सखोल चौकशी व्हावी. आतमध्ये सर्च ऑपरेशन करण्यात यावं. मुलांच्या शिक्षणाच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या मदरशांमध्ये अतिरेक्यांना पोसण्याचं काम होत असेल, तर असे मदरसे आम्हाला कशाला पाहिजेत? यमनचा नागरिक मदरशांमध्ये सापडणं म्हणजे किती मोठा धोका आहे?”, असे सवाल उपस्थित करत मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत मदरसा संस्थांवर हल्लाबोल केला आहे.

अधिक वाचा  भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनात साम्य आहे – राजेश घाडगे

नितेश राणे पुढे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारचं मनापासून अभिनंदन करेन. त्यांनी फार महत्त्वाची आणि मोठी कारवाई अक्कलकुवा, नंदूरबारमध्ये 10 फेब्रुवारी 2025 ला केलेली आहे. नंदूरबारमध्ये एक मदरसा आहे. त्या मदरशामध्ये फार मोठी कारवाई झाली. त्याच्यामध्ये यमनचा नागरिक सापडला. यमनचा एक शिक्षक सापडला. ही मदरसा बेकायदेशीर पद्धतीने सुरु आहे. यामध्ये पोलिसांनी फार मोठी कारवाई केली. या कारवाईत मदरसा चालवणाऱ्या सर्व लोकांना अटक होत आहे. एक मुलगा फरार आहे, त्यालाही पकडण्याचं काम पोलीस करत आहेत. मदरसे बेकायदेशीर पद्घतीने सुरु आहेत. राष्ट्रविरोधी कारवाया या मदरशामध्ये सुरु होत्या. त्याबाबतीत मुख्यमंत्री फडणवीस आणि पोलीस खातं सखोल चौकशी करत आहेत.

अधिक वाचा  माजी कृषीमंत्र्याच्या ‘पुत्रा’ची ‘वारसहक्क’ टिकवण्यासाठी भाजपमध्ये कोलांटउडी भाजपाचही टेन्शन गेलं; शहरभर निष्ठावंतांची नाराजी अन् बंड नवे संकट

“या मदरसामध्ये बेकायदेशीरपणे सर्वकाही सुरु होतं. काही वर्षांपूर्वी एक हिंदू शिक्षक या मदरशांमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. तो आतमध्ये आला म्हणून त्याला चाकूने भोसकलं जातं. त्याच्यावर हल्ला केला जातो. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना पत्रही दिलं आहे. मदरसामध्ये यमनचा अतिरेकी विचाराचा नागरिक सापडला आहे, विशालगडाजवळील मदरसामध्ये काही अतिरेकी राहून गेलेले आहेत. ज्याने देशविरोधात अतिरेकी कारवाया केल्या आहेत, तो ही त्या मदरशामध्ये सापडला होता. म्हणून मला राज्यामध्ये असलेल्या मदरशांवर प्रश्न उपस्थित करायचा आहे”, असंही नितेश राणे म्हणाले.