पुणे : अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले, ज्यानंतर मोठा गदारोळ झाल्याचे बघायला मिळाले. अनेकांनी राहुल सोलापूरकर यांच्यावर जोरदार टीका केली. जितेंद्र आव्हाड यांनी तर थेट म्हटले की, मी या राहुल सोलापूरकरला झोडणार आहे. आक्षेपार्ह विधानानंतर राहुल सोलापूरकरच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आलीये. आक्षेपार्ह विधानानंतर राहुल सोलापूरकर यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत माफी देखील मागितली.






राहुल सोलापूरकरांच्या अडचणीत होणार वाढ
आता याप्रकरणात महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडून दखल घेण्यात आलीये. बाबासाहेबांच्या ब्राम्हण असण्याबाबतचे संदर्भ, पुरावे आयोगापुढे सादर करावे. अन्यथा पुढील कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आयोगाने म्हटले आहे. यामुळेच आता अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचेही बघायला मिळतंय.
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठे विधान
या प्रकरणाबद्दल बोलताना पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले की, या प्रकरणाचे काही अर्ज आम्हाला मिळाले आहेत. त्याविषयावर माहिती घेण्यात आली आहे. ते व्हिडीओ जुने आहेत. त्यावर खुलासा देखील त्यांनी दिला आहे. आतापर्यंतच्या परिस्थितीमध्ये तो गुन्हाचा प्रकार दिसून येत नाही. आम्ही त्यांचे सर्व व्हिडीओ आणि खुलाश्याचे व्हिडीओ बघत आहोत, असे त्यांनी म्हटले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान
राहुल सोलापूरकर यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर लोक चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधानानंतर जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सरकारला टार्गेट केले गेले. हे सरकार आले की महापुरूषांचे अपमान केले जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. राहुल सोलापूरकरला धडा शिकवणार असल्याचे म्हणतानाही जितेंद्र आव्हाड हे दिसले होते.










