2025 वर्षात अनेक नवीन मूव्ही पाइपलाइनमध्ये आहेत. यातील काही मूव्ही रिलीज झाले आहेत. यंदाच्या वर्षातील पहिला ब्लॉकबस्टर मूव्ही मिळाला आहे. या मूव्हीने बजेट वसूल करून त्यापेक्षा अनेक पटीने पैसे वसूल केले आहेत. हा सिनेमा 2025 मधील पहिला ब्लॉकबस्टर ठरला आहे. हा सिनेमा कोणता आहे आणि यामध्ये कोणकोण स्टार्स आहेत यावर एक नजर टाकूया….






या सिनेमाचं नाव आहे ‘संक्रांतिकी वास्तुनम’. हा एक तेलुगू सिनेमा आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अनिल रविपुडी यांनी केलं आहे. या सिनेमात व्यंकटेश मुख्य भूमिकेत असून मीनाक्षी चौधरी, ऐश्वर्या राजेश, श्रीनिवास रेड्डी आणि साई कुमार यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा यंदाच्या वर्षीचा ब्लॉकबस्टर ठरला. आत्तापर्यंत रिलीज झालेल्या सिनेमांपैकी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली.
‘संक्रांतिकी वास्तुनम’ हा सिनेमा 2025 चा पहिला ब्लॉकबस्टर ठरला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 50 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या सिनेमाने 250 कोटींचं कलेक्शन केलं आहे. 2025 चा 250 कोटींचा टप्पा ओलांडणारा हा पहिलाच सिनेमा ठरला आहे. प्रेक्षकांनी सिनेमाला भरभरून प्रतिसाद दिलाय.
दरम्यान, ‘संक्रांतिकी वास्तुनम’ या सिनेमाची स्टोरी एका विवाहित जोडप्याची आहे. ज्यांच्या आयुष्यात EX ची एन्ट्री होते आणि पूर्ण लाइफ विस्कळीत होतं. एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्याकडे अपहरण प्रकरण सोडवण्यासाठी मदत मागते. त्यानंतर कहाणीत अनेक ट्विस्ट आणि टर्न येतात. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगली कामगिरी करत असून 2025 चा हा हिट सिनेमा आहे.











