युट्युबर आणि कॉमेडियन रणवीर अलाहाबादियाच्या एका अश्लील प्रश्नाने सोशल मीडियावर वादळ निर्माण केले आहे. फेसबुकवर तसेच आणि एक्सच्या प्लॅटफॉर्मवर लोक रणवीर अलाहाबादियाला प्रचंड ट्रोल करत आहेत. रणवीर अलाहाबादिया यूट्यूबवर बीरबिसेप्स नावाने एक चॅनल चालवतो. हे चॅनल डबल मीनिंग संवाद, भयानक कमेंट्स टिप्पण्या आणि काहीवेळा अडल्ट कंटेंटमुळे चर्चेत असतं. यावेळीही रणवीरने अशी एक कमेंट केली आहे ज्यामुळे सोशल मीडियावर भयानक गदारोळ सुरू झाला आहे. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडदरम्यान त्याच्या विधानामुळे हा वाद सुरू झाला. स्टँडअप कॉमेडियन रणवीर अलाहाबादिया हा इंडियाज गॉट टॅलेंट शोमध्ये आला होता. त्याच्यासह या शोमध्ये समय रैना, कंटेंट क्रिएटर आशीष चंचलानी, जसप्रीत सिंह आणि रिबेल कीड नावाने ओळखला जाणारा अपूर्व मुखीजा हे जज म्हणून सहभागी झाले होते.
त्या अश्लील प्रश्नावरून गदारोळ
आणि याच शोमध्ये रणवीरने एका स्पर्धकाला अश्लील, विवादास्पद प्रश्न विचारला, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रणवीर अलाहाबादियाने शोमधील एका स्पर्धकाला विचारले, “तुम्ही तुमच्या पालकांना आयुष्यभर दररोज इंटिमेट होताना पाहाल का किंवा एकदाच सहभागी होऊन ते कायमचे थांबवाल?” असा भयानक प्रश्न त्याने विचारला.
त्याच्या या अतिशय असभ्य प्रश्नावरून प्रचंड गदारोळ निर्माण झाला आहे. मात्र यावर रणवीरने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सोशल मीडियावर ट्रोलिंग
यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीकेचा पूर आला. डिजिटल मनोरंजनाच्या जगात संवेदनशीलता आणि नैतिक जबाबदारीचीदेखील गरज आहे,असे मत अनेकांनी व्यक्त केलं. तर रणवीर अलाहाबादियाने माफी मागितली पाहिजे अशी मागणी अनेक यूजर्सनी केली आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाईची मागणीही अनेकांनी केली आहे. बऱ्याच लोकांनी त्याला ट्रोल केलं आहे.
कवी नीलेश मिश्रा आणि काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेट यांनीही समावेश होता ज्यांनी रणवीर अलाहाबादिया याच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली. असे विकृत क्रिएटर्स देशाच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीला आकार देतात का असा सवाल निलेश मिश्रांनी विचारला. “साधे, असभ्य आणि असंवेदनशील शब्द फक्त कंटाळवाणे लोकांसाठी आहेत. हे क्रिएटर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही बोलू शकतात आणि त्यातून पळ काढू शकतात.” असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
इंडिया गॉट टैलेंट शो मध्ये झालेल्या वादग्रस्त वक्तव्याची पोलीस चौकशी सुरू झाली आहे. लाईव्ह शो दरम्यान केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची पोलिसाकडून चौकशी सुरू आहे. पोलिसांचे पथक हॅबीटैटच्या कार्यालयात पोहोचले आहे .
तर मुख्यमंत्री देवेंद् फडणवीस यांनीही या वक्तव्याची दखल घेतली आहे. काही गोष्टी असंस्कृत पद्धतीने हाताळल्या गेल्या आहेत, जे पूर्णपणे चुकीचे आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे पण जेव्हा आपण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करतो तेव्हा आपले स्वातंत्र्य संपते. हे योग्य नाही, प्रत्येकाला मर्यादा असतात,असे मुख्यमंत्री म्हणाले.