उद्योगमंत्री उदय सामंत नाराज? पत्र समोर येताच तातडीची पत्रकार परिषद; म्हणाले, तो माझा अधिकार!

0

महायुतीमधील शिवसनेच्या (Shivsena) मंत्र्यांचा नाराजीचा सूर कायम असल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना मुख्यनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर मी नाराज नसल्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. त्यातच, आता उद्योगमंत्री उदय सामंत (uday samant) हेही नाराज असल्याचे समजते. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्वतःच्याच उद्योग खात्यातील प्रधान सचिव आणि सीईओ यांच्याजवळ नाराजी व्यक्त करत पत्र लिहिल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र, या वृत्तानंतर उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले. तसेच मी राज्याचा कॅबिनेटमंत्री आहे, मला प्रधान-सचिवांच्या मान-सन्मानाबद्दल कळते, असे म्हणत उदय सामंत यांनी लिहिलेल्या नाराजी पत्रावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

उदय सामंत यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात तसेच उद्योग विभागाची काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय परस्पर प्रशासकीय पातळीवर घेत असल्याबाबत पत्रातून नाराजी व्यक्त केली आहे. धोरणात्मक निर्णय, महत्त्वाचे कामकाजाबाबत आणि कामकाजाविषयी सचिव उद्योग तसेच मुख्याधिकारी, कार्यकारी अधिकारी यांनी नियमित ब्रिफिंग करावी, याची दक्षता घ्यावी असा सज्जड दमच या पत्रातून अधिकाऱ्याना भरला आहे. अधिकारी परस्पर कारभार करतात, मंत्र्यानाही विश्वासात घेत नसल्याची खंत सामंतांनी पत्रातून व्यक्त केल्याची माहिती आहे. आता, सामंत यांच्याकडून या पत्रासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

मी 4 फेब्रुवारी 2025 रोजी अंतर्गत पत्र आमच्या विभागाला दिलं, ते तुमच्यापर्यंत उशिरा पोहचलं आहे. काम कसं सुरू आहे आणि ते तुमच्यापर्यंत उशिरा पोहचलं हे आमचं यश आहे यात मी नाराज नाही. धोरणात्मक निर्णयाची माहिती आम्हाला द्यावी हेच मी पत्रातून म्हटलयं. सत्तेचं केंद्रीकरण करण्यापेक्षा विक्रेंद्रीकरण केलं. स्वत:कडचे सर्व अधिकार आपल्याकडेच ठेवण्यापेक्षा इतर अधिकाऱ्यांना ते द्यावेत, मी नाराज नाही, मी कॅबिनेटमंत्री आहे. माझ्या हाताखाली प्रधान सचिव काम करतात, प्रधान सचिव यांचा मानसन्मान आणि माझा मान सन्मान याची मला जाणीव आहे, असे म्हणत उदय सामंत यांनी पत्रावरील नाराजीसंदर्भाने स्पष्टीकरण दिले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

लोकांचं काम, उद्योजकांच काम महत्त्वाचं

लोकांना उद्योजकांना त्याचा फायदा व्हावा, या पत्रातून माझी नाराजी नाही ती महत्वाचीही नाही, लोकांचं काम उद्योजकांचं काम होणं महत्वाचं आहे. जनतेत प्रश्न मांडता यावेत यासाठी मला ब्रिफिंग व्हावी हेच म्हटले आहे. अधिकारी पत्रकार परिषद घेऊ शकत नाहीत. मी कोणाच्याही अधिकारावर गदा आणत नाही, दबाव टाकत नाही. पुरंदर विमानतळाच्या जागेचा प्रश्न सुटला,याचे उदाहरणही सामंत यांनी दिले. तसेच, सिनारमस कंपनीबाबत मला ब्रिफिंग झालं नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पत्रातून मी सूचना केल्या

एखादं काम मुंबईला येण्यापेक्षा त्या त्या जिल्ह्यात झालं तर चांगलयं ना? नागपूरमध्ये आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसा निमित्त मोफत टॅब वाटले, निविदा कपात का झाली? हे मी विचारलं तर काय बिघडलं, असा सवाल उपस्थित करत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी थेट नाराजी व्यक्त केली आहे. मी नाराज झालो तरी माझा अधिकार मला माहित आहे, 4 तारखेला दिलेलं पत्र 10 तारखेला बाहेर आलं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. या पत्रातून सूचना किंवा कशा पद्धतीतून काम व्हायला हवं असा अर्थ काढता येऊ शकतो. मी पत्राचा अर्थ वेगळा लावलेला नाही, ज्यांनी कोणी पत्र दिलं त्यानी तो अर्थ लावला आहे, असेही सामंत यांनी स्पष्ट केलं.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन