एक्झिट पोलनंतर ‘आप’चा पोल, उमेदवारांचा केजरीवालांना ग्राऊंड रिपोर्ट, एवढ्या जागा जिंकणार?

0

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेचे एखादा अपवाद वगळता सर्वच एक्झिट पोल हे भाजपचे सरकार येणार असेच स्पष्ट करत आहे. उद्या दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे उद्या दिल्लीत आप हॅट्ट्रीक करणार की भाजप २७ वर्षांनी दिल्ली काबीज करणार हे कळणार आहे. दरम्यान आज आम आदमी पक्षाच्या नेत्यांमध्ये आज एक बैठक पार पडली त्यात उमेदवाराकडून माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या अंतर्गत रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. असे पक्षाचे नेते गोपाल राय यांनी सांगितले.

आपला किती जागा मिळणार?

आपच्या रिपोर्टनुसार दिल्लीच्या विधानसभेत पक्षाच्या जागा गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कमी होणार आहेत. पक्षाला ५० हून जास्त जागा मिळतील. तसेच ७ ते ८ जागांवर कडवी लढत होणार असून या जागांवरही आपला जिकंण्याची आशा आहे. २०२० मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला ७० पैकी ६२ जागा मिळाल्या होत्या. २०१५ मध्ये आपला ६७ जागांवर ऐतिहासिक विजय मिळाला होता.

अधिक वाचा  निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारची काय भूमिका?

विरोधी पक्षाकडून एक्झिट पोलचा वापर

शनिवारी होणाऱ्या मतमोजणीपूर्वी सर्व उमेदवारांसोबत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. आजच्या बैठकीमध्ये उमेदवारांनी त्यांच्या मतदारसंघातील रिपोर्ट सादर केला. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, पक्ष दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी तयार आहे. त्यांनी आरोप लावला की विरोधी पक्ष ऑपरेशन लॉटस ला पूर्णत्वास आणण्याच्या प्रयत्नात मानसिक दबाब बनवा म्हणून एक्झिट पोलचा वापर करत आहे.

या बैठकीनंतर पक्षाचे नेते गोपाल राय यांनी पत्रकांरांशी बोलताना सांगितले की, केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उमेदवारांनी ग्राऊंड रिपोर्ट सादर केले. जे सूचित करत आहेत की आप ५० हून जास्त जागांवर निर्णायक विजय मिळवत आहे. तर, ७ ते ८ जागांवर कडवी लढत होणार आहे. राय यांनी दावा केला की विरोधी पक्ष एक्झिट पोल चा वापर करुन चुकीची आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

अधिक वाचा  पुण्यात महायुतीची ताकद आणखी वाढली; पर्वती, खडकवासला, धायरी, वडगाव शेरीचे पदाधिकाऱ्यांचे पक्षांतर

ते पुढे म्हणाले की, ‘एक्झिट पोलच्या माध्यमातून विरोधी पक्ष आपण सत्ता स्थापन करत आहोत हे पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आरोप केला आहे की, विरोधी पक्ष पैसे आणि मंत्रिपदाच्या ऑफरचा फोन करत आहेत.