2019 ते 2024 एकूण 34 लाख मतदार नोंद मात्र  5 महिन्यात तब्बल 39 लाख नव मतदार नोंद कुठून आली? राहुल गांधींचा सवाल

0

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठं बहुमत मिळालं. मात्र, ही निवडणूक अनेकांची अंदाज चुकवणारी ठरली. या निवडणुकीमध्ये EVM हॅक केले गेल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी आज दिल्लीमध्ये संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत हा मुद्दा उपस्थित केला आणि अत्यंत गंभीर आरोप केले.

राहुल गांधी यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले.  2019 ते 2024 दरम्यान राज्यात 34 लाख मतदार नोंदवले गेले. मात्र,  तब्बल 39 लाख मतदार लोकसभा आणि विधानसभेच्या दरम्यानच्या 5 महिन्यात नोंदवले गेले. विधानसभेपूर्वी सहभागी झालेले हे 39 लाख मतदार कोण आहेत असा प्रश्न राहुल गांधी यांनी  उपस्थित केला. त्यामुळे निवडणूक आयोगाने आम्हाला या 39 लाख मतदारांची यादी नाव, पत्ता आणि फोटोसह द्यावी अशी मागणी आम्ही करतोय. मात्र, निवडणूक आयोग आम्हाला ही यादी देत नाही असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

राहुल गांधी यांनी पुढे बोलताना सांगितलं की, महाराष्ट्र सरकारच्या आकड्यांनुसार राज्यात 18+ असलेली लोकसंख्या 9.54 कोटी आहे. तर निवडणूक आयोगानुसार 9 कोटी 70 ला लोकांनी मतदान केलं. त्यामुळे प्रौढ नागरिकांच्या लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त कशी असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.

कामठी विधानसभेचं उदाहरण

राहुल गांधी यांनी कामठी विधानसभेचंही उदाहरण दिलं. ते म्हणाले, काँग्रेसला 1.36  लाख मतदान मिळालं. लोकसभेलाही 1.34 लाख मिळालं.  मात्र, लोकसभेत भाजपला 1.19 ला मतदान मिळालं. 35 हजार नवे मतदार सहभागी झाले होते आणि नवे पूर्ण मतं  भाजपला मिळाले असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

राहुल गांधी पुढे म्हणाले. “महाराष्ट्रात आमची मतं कमी झाली नाहीत. भाजपची मतं वाढली आहे. आम्ही आरोप करत नाही, पण आम्हाला मतदारांची यादी हवी आहे. लोकसभा आणि विधानसभेची यादी नाव, पत्ता, फोटोसह द्या. हे तुम्ही का देत नाहीत?”