राष्ट्रवादीच्या आमदाराने आमदार झाल्याच्या आनंदात हत्तीवरून काढली मिरवणूक; या कायद्याचे उल्लंघन गुन्हा दाखल

0

विधानसभा निवडणुकीतील विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी अजित पवार गटाचे भोरचे आमदार शंकर मांडेकर यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची मिरवणूक काढत हत्तीवरून पेढे वाटले होते. या मिरवणुकीचा व्हिडीओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. मात्र, आता हत्तीवरून पेढे वाटणं त्यांना चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे. वनविभागाने आता मिरवणुकीच्या आयोजकांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वनविभागाने वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करत मिरवणुकीचे संयोजक राहुल बलकवडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय या मिरवणुकीसाठी हत्ती देणाऱ्या तासगाव गणपती पंचायतन संस्थांनच्या अध्यक्षांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा  पुणे भाजपच्या दुटप्पी भूमिकेने शिवसेनेपुढे प्रश्नचिन्ह?; पदरात तोकड्याच जागा अन् त्याही एकदम कडक पाषाण

आमदार झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी रविवारी पिरंगुट येथे आमदार शंकर मांडेकर यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली होती. तसेच हत्तीवरून १२५ किलो पेढे वाटले होते. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर आता पुण्याचे वन्यजीवसंरक्षक आदित्य परांजपे यांनी याची गांभीर्याने दखल घेत कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

आमदार शंकर मांडेकर यांनी या मिरवणुकीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. भोर – राजगड – मुळशी मतदार संघाच्या आमदार पदी निवड झाल्याबद्दल उरवडे,आंबेगाव, बोतरवाडी, मारणेवाडी, गाडेवाडी, कांजणेनगर, शेलारवाडी, काळभोरवाडी, चोरघेवाडी, बलकवडेवाडी, गवळीवाडा व पंचक्रोशीतील मधील ग्रामस्थ मंडळींनी माझी अभूतपूर्व अशी हत्तीवरून मिरवणूक काढत सुमारे १२५ किलो पेढे वाटले. ह्या सर्व ग्रामस्थांनी माझ्यावर व्यक्त केलेले प्रेम मी कदापि विसरू शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती

अधिक वाचा  पक्ष प्रवेशातच वादळ काँग्रेस, उबाठा माजी नगरसेवकांचा प्रवेश; मंत्री महोदयांसमोर कार्यकर्ते भिडले बंदोबस्त तैनात

माझ्या वर नागरिकांनी टाकलेला विश्वास हा माझ्या कामातून सिद्ध करून दाखवीन हा विश्वास मी देतो. या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या पंचक्रोशीतील माझ्या माय-बाप जनतेचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, असेही ते म्हणाले होते.