भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प सादर केला. यावेळी निर्मला सीतारमन यांनी 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली. त्यामुळे 12 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असलेल्यांना मोठा दिलासा मिळाला. तसेच अर्थमंत्री म्हणून आठव्यांदा अर्थसंकल्प माडंताना निर्मला सीतारमन यांनी विविध क्षेत्रांसाठी भरभरून आर्थिक तरतुदी केल्या. यावेळी त्यांनी उद्योग, आरोग्य, तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रासाठी अनेक मोठ्या तरतुदी केल्या. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी अनेक मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. तसेच गंभीर आजारावरील 36 औषधे ड्युटी फ्री केली.
निर्मला सीतारमन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात विविध राज्यांसाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या. मात्र हा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर विरोधकांकडून महाराष्ट्रासाठी काय तरतुदी करण्यात आल्या असा सवाल उपस्थितीत केला जात आहे. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले, याबद्दलची संपूर्ण आकडेवारी सांगितली आहे.
https://x.com/Dev_Fadnavis/status/1885649743260381327?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1885649743260381327%7Ctwgr%5E5f0c7a4fd293a7eecd1f3a6e9e05dc27332cc7fa%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fbudget%2Fcm-devendra-fadnavis-share-tweet-date-how-much-funding-maharashtra-receive-see-details-1343107.html
देवेंद्र फडणवीसांचे ट्वीट
केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्र! (टिप : ही केवळ प्राथमिक माहिती. विविध मंत्रालयांची तरतूद तसेच रेल्वेची आकडेवारी सविस्तरपणे येईल.)
– मुंबई मेट्रो : 1255.06 कोटी
– पुणे मेट्रो : 699.13 कोटी
– एमयुटीपी : 511.48 कोटी
– एमएमआरसाठी एकात्मिक हरित प्रवासी सुविधा: 792.35 कोटी
– मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे : 4004.31 कोटी
– इकॉनॉमिक क्लस्टर : 1094.58 कोटी
– महाराष्ट्र ग्रामीण जोडसुधार प्रकल्प: 683.51 कोटी
– महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क : 596.57 कोटी
– नागनदी सुधार प्रकल्प : 295.64 कोटी
– मुळा-मुठा नदी संवर्धन : 229.94 कोटी
– ऊर्जा कार्यक्षम उपसा सिंचन प्रकल्प : 186.44 कोटी, असे ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
अजित पवारांकडून समाधान व्यक्त
तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले. तसेच महाराष्ट्राला किती निधी मिळाला, याबद्दलची सविस्तर माहिती दिली. एमयुटीपी-३ प्रकल्पासाठी १४६५ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मिळाला. पुणे मेट्रोसाठी ८३७ कोटींची तरतूद करण्यात आली. मुळा-मुठा नदी संवर्धनासाठी जायकांतर्गत २३० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या चार प्रकल्पांसाठी ४ हजार ३ कोटी, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे – प्रशिक्षण संस्थेसाठी १२६ कोटी ६० लाख, मुंबई मेट्रोसाठी १६७३ कोटी ४१ लाख, महाराष्ट्र ग्रामीण दळणवळण सुधारणांसाठी ६८३ कोटी ५१ लाख, महाराष्ट्र ऍग्री बिझनेस नेटवर्क-मॅग्नेट प्रकल्पासाठी ५९६ कोटी ५७ लाख, ऊर्जा संवर्धन व लिफ्ट इरिगेशन प्रकल्पासाठी १८६ कोटी ४४ लाख, इंटीग्रेटेड ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रकल्प मुंबईसाठी ६५२ कोटी ५२ लाख, सर्वसमावेशक विकासासाठी आर्थिक क्लस्टर जोडणी कामांसाठी १०९४ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी देण्यात आल्याचे अजित पवारांनी म्हटले.