शरिफुलच्या वडिलांच्या दाव्याने नवीन ट्विस्ट सैफ अली खानवर हल्ला करणारा दुसराच; माझ्या मुलाला अडकवण्यात येत आहे

0

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात नवीन वळण आले आहे. मुंबई पोलिसांनी 30 वर्षीय मोहम्मद शरीफुल इस्लाम (Mohammad Shariful Islam) या हल्लेखोराला ठाणे येथून अटक केली आहे. पण आता शरीफुलच्या वडिलांनी हा दावा खोडून काढला आहे. आपल्या मुलाला फसवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. सीसीटीव्हीत दिसत असलेला आरोपी आणि माझा मुलगा वेगवेगळा आहे. त्या दोघांमध्ये कोणतेही साम्य नाही. या हल्ल्यात माझ्या मुलाचा हात नाही, असा दावा शरीफुलच्या वडिलांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

आरोपीच्या वडिलांचा दावा काय?

सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणात आरोपीचे वडील मोहम्मद रूहुल अमीन फकीर यांनी मोठा दावा केला आहे. आपला मुलगा निर्दोष आहे. त्याला या प्रकरणात अडकवण्यात येत आहे. त्याच्यावर खोटा आरोप लावण्यात आला आहे. पोलिसांना काहीतरी चुकीची माहिती मिळाली आहे. त्यांनी अजून सखोल तपास करावा. आपल्या मुलाला सोडण्यात यावे अशी मागणी आरोपीच्या वडिलांनी केली आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

आरोपीचे ठसे जुळले

तर दुसरीकडे पोलिसांनी अभिनेता सैफ अली खान प्रकरणात अटक केलेल्या आरोपीचे ठसे जुळल्याची अपडेट दिली आहे. शरीफुल आणि घटनास्थळावरील त्याच्या हाताचे ठसे जुळत असल्याचे न्यायवैद्यकीय पुरावे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तर शरिफुल याने त्याचा गुन्हा सुद्धा कबूल केल्याचा पोलिसांचा दावा आहे.

काँग्रेसने केला सवाल

एकनाथ शिंदे गटाचे नेते संजय निरूपम यांनी सैफ अली खान हल्ला प्रकरणात संशय व्यक्त केला. नंतर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी इतका मोठा हल्ला होऊन सुद्धा सैफ पाच दिवसात इतका फिट कसा असा सवाल केला होता. तर आता राज्यातील काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा मुंबई पोलिसांना याप्रकरणात स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. जी व्यक्ती अटक करण्यात आली आहे आणि सीसीटीव्हीत दिसणाऱ्या व्यक्ती मेळ खात नसल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार