मोठी अपडेट… वाल्मिक कराडचा खंडणी प्रकरणातील जामीन अर्ज मागे; कारण गुलदस्त्यात

0

वाल्मिक कराड याचा खंडणी प्रकरणातील जामीन अर्ज मागे घेण्यात आला आहे. वाल्मिकच्या वकिलांनी हा अर्ज मागे घेतला आहे. जामीन अर्जाच्या सुनावणीसाठी दोन तारखा झाल्यानंतर आज सुनावणी होणार होती. त्यामुळे कराडला जामीन की एमसीआर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. मात्र वाल्मिकचे वकील अशोक कवडे यांनी जामीन अर्ज मागे घेतला आहे. जामीन अर्ज मागे घेण्याचं कारण गुलदस्त्यात आहे. मात्र, कराड याने अर्ज मागे घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

वाल्मिक कराडने जामीन अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर आलेली असतानाच कराड याची प्रकृतीही बिघडल्याचं समोर आलं आहे. वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात भरती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

पोटदुखीचा त्रास, रुग्णालयात दाखल

याबाबत बीड जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी शल्यचिकित्सक डॉक्टर एस.बी. राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाल्मिक कराडला पोटात दुखण्याचा त्रास होत असल्याचे जिल्हा कारागृहाकडून कळवण्यात आले होते. त्यानुसार कारागृहात जाऊन तपासणी करण्यात आली. पुढील तपासणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करणे गरजेचे असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यानुसार कारागृह प्रशासनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. कराडवर सध्या उपचार सुरू आहेत. काही तपासणी करणे गरजेचे आहे. सोनोग्राफी, रक्त चाचणी, यूरिन टेस्ट केली जाणार आहे.. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असं एसबी राऊत म्हणाले. पोटदुखीचा त्रास होत असताना वाल्मिक कराडला काल रात्री 12.30 वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या याच ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

आलिशान वाहनातून फरार?

दरम्यान, कराड आणि इतर आरोपी सीआयडीला शरण जाण्यापूर्वी बीडवरून पुण्याला गेले होते का? असा सवाल केला जात आहे. तीन आलिशान वाहनांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने याबाबतची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर तीन आलिशान गाड्यांमधून आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा आहे. बीडच्या मांजरसुंबा येथील एका हॉटेलवर त्यांनी जेवण केले, तसेच एका पेट्रोल पंपावर गाडीत डिझेल भरले. याच गाड्या धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोल नाका येथे रात्री 1.36 वाजता पास झाल्या. या गाड्यांमध्ये बसून आरोपी गेले अशी चर्चा आहे. तसेच याच आलिशान वाहनांमधून त्यांना फरार होण्यास मदत केली असावी अशी शक्यता आहे. पुण्यात सीआयडीच्या कार्यालयात शरणागती पत्करताना कराड ज्या गाडीतून आला, ती गाडी याच ताफ्यातील होती, असं सांगितलं जात आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा