भाजपचा ‘सीक्रेट प्लान’ लीक; आत्ता यांचाही शिंदे करण्याची तयारी? मनातील गोष्ट ओठांवर

0

बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्नची पुनरावृत्ती करण्याची तयारी भारतीय जनता पक्षानं सुरु केली आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदेंना विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. आता तसाच प्रकार बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत घडण्याची शक्यता आहे. बिहार भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेलं विधान आता चर्चेत आलं आहे. त्यांच्या विधानानं भाजपचा सीक्रेट प्लान लीक झाल्याची चर्चा आहे.

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा काही दिवसांपूर्वीच बिहार दौऱ्यावर आले होते. तेव्हा पत्रकारांनी त्यांनी याच वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतील मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाला थेट उत्तर देणं शहांनी टाळलं. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नितीश कुमारच असतील, असं उत्तर शहांनी दिलं. त्याऐवजी याबद्दलचा निर्णय भाजपची संसदीय समिती घेईल, असं म्हणत शहांनी वेळ मारुन नेली.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

सोमवारी (२० जानेवारी) छपरा जिल्ह्यात महसूल मंत्री दिलीप जयस्वाल एका कार्यक्रमाला संबोधित करत होते. त्या कार्यक्रमात बोलताना जयस्वाल यांनी नितीश कुमारांचा उल्लेख लक्षवेधी ठरला. दिलीप जयस्वाल बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्षदेखील आहेत. त्यामुळे त्यांनी नितीश कुमारांचा उपमुख्यमंत्री असा केलेला उल्लेख चर्चेचा विषय ठरला. भाजपच्या मनातील गोष्ट जयस्वाल यांच्या ओठांवर चुकून आली का, असा प्रश्न यानंतर उपस्थित होत आहे.

जयस्वाल भाषण करताना राज्य आणि केंद्रातील एनडीए सरकारचा उल्लेख करत होते. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नितीश कुमार यांचं डबल इंजिन सरकार आहे. सोबत जीतन राम मांझी, चिराग पासवान, उपेंद्र कुशवाह, असे आम्ही पाच पांडव आहोत. आमच्यासमोर कौरवांची सेना आहे. ती अराजकता, घराणेशाहीसाठी सरकार चालवू इच्छिते,’ असं जयस्वाल म्हणाले.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ आता नितीश कुमार यांनाही मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतर उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं लागणार का, अशी चर्चा जयस्वाल यांच्या विधानानंतर सुरु झाली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाच्या आमदारांची संख्या भाजपच्या आमदारापेक्षा ३० नं कमी आहे. तरीही भाजपनं त्यांना मुख्यमंत्रिपद दिलं आहे. तशीच परिस्थिती महाराष्ट्रात २०२२ मध्ये निर्माण झाली होती. एकनाथ शिंदेंसोबत केवळ ४० आमदार असतानाही भाजपनं त्यांना मुख्यमंत्रिपद दिलं होतं. पण विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपनं मुख्यमंत्रिपद आपल्याकडे ठेवत शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद दिलं.