‘शरद पवारांना आता मी सांगतो…’ अस्थिरतेचं राजकारण समाप्त करून एक मजबूत सरकार दिलं म्हणत शहांनी थेट ‘ही’ आकडेवारीच मांडली!

0

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवत सत्तेत पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं. शिवाय, ऐतिहासिक जागांवर विजय मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आणि अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले. यामुळे राज्यात महायुतीच्या विशेषकरून भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. आता आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणुका होणार आहे. तत्पुर्वी आज शिर्डीत भाजपचं प्रदेश महाविजय अधिवेशन पार पडलं.

या अधिवेशनास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी राज्यभरातून आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह नेत्यांना मार्गदर्शन केलं तसेच विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजयी केल्याबद्दल त्यांचे कौतुकही केलं. यावेळी अमित शाह यांन भाषणातून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अमित शाह म्हणाले, “महाराष्ट्रातील महाविजयानंर पहिल्यांदाच आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. तुम्हा सर्वांना कल्पना नाही की, तुम्ही किती मोठं काम केलं आहे. तुम्हाला वाटतं देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनले, एवढ्या मोठ्या प्रमाणात आपले कार्यकर्ते आमदार बनले, मंत्री बनले. आपले सहकारी पक्ष खरी शिवसेना आणि खऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही विजय मिळाला. परंतु महाराष्ट्रातील या विजय अनेक अर्थ आहेत. महाराष्ट्राच्या विजयाने १९७८ पासून शरद पवारांनी जे दगाफटक्याचं राजकारण सुरू केलं होतं. त्याला 20 फूट जमिनीत गाडण्याचं काम तुम्ही केलं आहे.”

अधिक वाचा  भाजपची यादी पुण्यात दाखल अजूनही प्रवेश सुरूच?; प्रशांत जगतापांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम? काँग्रेसचे माजी राज्यमंत्री भाजपवासी?

तसेच, “उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत जो द्रोह केला होता, २०१९मध्ये विचारधारा सोडली होती आणि बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांतांना सोडलं होतं. खोटं बोलून, विश्वासघात करून मुख्यमंत्री बनले होते. त्या उद्धव ठाकरेंना तुम्ही त्यांची जागा दाखण्याचं काम केलं. नेहमीच १८७८ ते २०२४ पर्यंत महाराष्ट्र अस्थिरतेचं शिकार होतं. त्या अस्थिरतेच्या राजकारणाला समाप्त करून, एका स्थिर मार्गावर चालण्याचं काम, एक मजबूत देवेंद्र फडणवीस सरकार देवून तुम्ही केलं आहे. याचसोबत हिंदुत्व आणि मोदींचं विकासाचं राजकारण देखील आहेच.” असंही शाह म्हणाले.

याशिवाय “आपले सर्व विरोधी बाह्या सरसावून वाट बघत होते, की लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात आपला विजय होईल. परंतु त्यांच्या या स्वप्नांना धुळीस मिळवण्याचं काम तुम्ही सर्वांनी केलं आहे. खरंच या विजयाचे अनेक अर्थ आहेत. एक फोटो मी बघितला होता, शरद पवारांच्या पाठिमागे एक मोठा नकाशा होता. तिथे उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबई हे सर्वच क्षेत्र दाखवले होते आणि शरद पवार पत्रकारांना समजावत होते, की काय काय होणार? मात्र आता मी शरद पवारांना समजावू इच्छितो की काय काय झालं?” असं म्हटलं.

अधिक वाचा  पुण्यात रात्रीत सर्वात मोठी घडामोड; पवारांची बिन आवाजाची काठी चालली अन् ‘देवाभाऊं’चे मनसुबे उधळले

आणि “उत्तर महाराष्ट्रात २२ पैकी २१ जागा आमची महायुती जिंकली आहे. कोकणात १७ पैकी १६ जागा, पश्चिम महाराष्ट्रात २६ पैकी २४ जागा, पश्चिम विदर्भात १७ पैकी १५ जागा, पूर्व विदर्भात २९ पैकी २२ जागा, मराठवाड्यात २० पैकी १९ आणि मुंबईत १७ पैकी १५ जागा जिंकणयाचं काम तुम्ही सर्वांनी (कार्यकर्ते) केलं. ज्यांनी विश्वासघातचं राजकारण सुरू केलं ते शरद पवार आणि शेवटी धोका ज्यांनी दिला ते उद्धव ठाकरे दोघांनीही घरी बसवण्याचं काम महाराष्ट्राच्या जनतेने केलं आहे.” अशी आकडेवारी मांडत अमित शाह यांन शरद पवारांवर निशाणा साधला.

अधिक वाचा  अजितदादांची ही खेळी पुणेरी राजकारणात मोठी उलथापालथ; 3 पक्षात वादाचा भडका आणि भाजपाची ही गणिते बिघडली आत्ता दुरंगी लढती शक्य