वर्षाच्या सुरुवातीला हरभजन सिंग संघाच्या सुपरस्टार कल्चरबद्दल बोलला होता. खरंतर, बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. यासह, भारताने 10 वर्षांनी ही ट्रॉफी गमावली. या पराभवानंतर टीम इंडियावर जोरदार टीका होत आहे. संघाचे कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भविष्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पराभवानंतर हरभजनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सुपरस्टार संस्कृतीवर प्रश्न उपस्थित केले होते. तो म्हणाला होता, “एक सुपरस्टार कल्चर निर्माण झाली आहे. जे संपले पाहिजे. आपल्याला सुपरस्टार्सची गरज नाही, तर कामगिरी करू शकणाऱ्या खेळाडूंची गरज आहे. जर तसे झाले तर संघ पुढे जाईल.”






याआधी सिडनी कसोटी सामन्यात रोहितने स्वतःला प्लेइंग-11 मधून बाहेर ठेवल्यानंतर एका युजरने प्रश्न उपस्थित करत म्हटले की, कोणता नेता आपला संघ असा सोडून पळून जातो का? यावर हरभजनने लिहिले की, “मला माहित आहे कोण पळून गेले. मी तुम्हाला आठवण करून देऊ का? आणि तुम्हाला कारण देखील सांगतो. तुमच्या अंगावर काटा येईल.” या पोस्टनंतर हरभजन सिंगला सोशल मीडियावर खुप ट्रोल करण्यात आले होते.











