भवानीमाता गाभाऱ्याला पुरातन झळाळी; मंचकी निद्रेतून तुळजाभवानी सिंहासनावर विराजमान देवीची मुर्ती ही चल मुर्ती गाभाऱ्याचे काम पूर्ण

0

तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा संपून आज शाकंभरी महोत्सवाला सुरुवात झाली आहे. दरम्यान देवीच्या मंचकी निद्रेच्या काळात देवीच्या मुख्य गाभाऱ्याला पुरातन झळाळी देण्यात आली आहे. गाभाऱ्यातील भिंतीवर लावण्यात आलेले ग्रॅनाईट काढत मूळ दगडांना ब्रशिंग व सेंड ब्लास्टिंग करत गाभाऱ्याला पुरातन लुक देण्यात आला आहे. यामुळे भाविकांना आता मंदिराच्या गाभाऱ्यात पुरातन लूक पाहता येणार आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिराची पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली मुंबईतील सवानी कन्स्ट्रक्शनने हे काम केले आहे. विकास आराखड्यातील एकूण तिन टप्यात होणाऱ्या कामाचा पहिला टप्पा सुरु करण्यात आला आहे. यासाठी ५८ कोटी १२ लाख रुपयाच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तुळजाभवानी मंदिरातील होम कुंड, पालखी कट्टा आणि स्टेडीयमचे काम पहिल्या टप्यात पुर्ण केले जाणार आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

गाभाऱ्याचे काम पूर्ण

तुळजाभवानी देवीच्या मंदिराचे जतन व संवर्धन करण्याच्या अनुषंगाने पुरातत्व विभागाकडून हे काम सुरु करण्यात आले आहे. तीन टप्प्यात काम करण्यात येणार असून तुळजाभवानी देवी आठ मंचकी निद्रा अवस्थेत होती. या आठ दिवसांच्या कालावधीत मंदिरातील गाभाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे आता गाभाऱ्यात पुरातन लूक पाहण्यास मिळत आहे.

तुळजाभवानी देवी आज सिंहासनावर विराजमान

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीची आठ दिवसाची मंचकी निद्रा संपून आज देवी सिंहासनावर पुन्हा विराजमान झाली आहे. देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होत असून १४ तारखेपर्यंत हा शाकंभरी नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. दरम्यान देवीची मुर्ती ही चल मुर्ती आहे. त्यामुळे देवीचे सिंहासन व संपुर्ण गाभारा गोमुख तिर्थाने धुवुन घेण्यात आला. त्यानंतर पहाटे विधिवत पुजा करून तुळजाभवानीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. शाकंभरी नवरात्रोत्सव म्हणजे देवीचा छोटा दसरा असतो त्यासाठी आज दुपारी घटस्थापना करत विधिवत पूजा केली जाते.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा