संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट; सीआयडीच्या हाती मोठं यश 2आरोपींना बेड्या पण मुख्य मात्र…फरारच!

0

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या घटेनचा सर्व स्तरावरुन निषेध केला जात आहे.आता संतोष देशमुख हत्याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. बीड संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीच्या हाती मोठं यश मिळालं आहे. या हत्या प्रकरणातील फरार असलेल्या तीनपैकी 2 आरोपींना पकडल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपी गेल्या काही दिवसांपासून फरार होते. आता या 3 पैकी 2 आरोपींना पकडल्याची माहिती समोर येत आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सिद्धार्थ सोनावणे आणि सुधीर सांगळे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आल्याचे बोललं जात आहे. आता पोलीस या दोघांना कधी अटक करणार, त्यांना कोर्टात कधी हजर केले जाणार, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

सिद्धार्थ सोनावणे मुंबईतून ताब्यात

गेल्या काही दिवसांपासून आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे तीन आरोपी फरार होते. सीआयडीकडून त्यांचा कसून शोध सुरु होता. सीआयडीचे वेगवेगळे पथक मुंबई, पुणे यांसह ठिकठिकाणी शोध घेत होते. अखेर आता यातील सिद्धार्थ सोनावणेला मुंबईतून ताब्यात घेण्यात आले आहे. सिद्धार्थ सोनावणे यानेच सरपंच संतोष देशमुख यांची टीप दिली होती, असा आरोप त्याच्यावर आहे. आता लवकरच बीड पोलीस अधिक्षक एक पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत पोलीस याबद्दलची सविस्तर माहिती देतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप

दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीने 100 पेक्षाही जास्त जणांचा जबाब नोंदवला आहे. तसेच या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यालाही अटक केली. वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप आहे. या प्रकरणात सीआयडीने आरोपींच्या फोनची कॉल हिस्ट्री, सीडीआर तपासला आहे. सीआयडीला आरोपींच्या स्कॉर्पिओ गाडीतून मोबाईलदेखील सापडले आहेत. त्या मोबाईलमधून व्हिडीओ देखील प्राप्त झाल्याची चर्चा आहे. पण असं असलं तरीही तपासात आतापर्यंत काय-काय पुरावे मिळाले, याबाबत पूर्ण तपास होत नाही तोपर्यंत खुलासा होणार नाही.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा