डॉ. मनमोहन सिंग यांचे पुणेकरांशी उलगडले मोहक नाते; शरद पवार यांच्या बंगल्यावर …एक हृद्य आठवण : मणियार

0

सलग दहा वर्षे देशाचे पंतप्रधानपद भूषविणारे काँग्रेसचे नेते डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या वृत्ताने अवघे काँग्रेसजन हळहळले. मितभाषी, परंतु तितकेच दृढनिश्चयी आणि संयमी स्वभावाच्या मनमोहन सिंग यांच्या विविध हृदयस्पर्शी, नाजूक व अविस्मरणीय आठवणींना आज शहरातील काँग्रेसजनांनी उजाळा दिला. त्या आठवणींतून त्यांचे पुण्याशी असलेले मनमोहक नातेच उलगडत गेले. काँग्रेस नेते व शरद पवार यांचे निकटवर्तीय विठ्ठल मणियार यांच्या आठवणीतून त्यांच्या संयमी स्वभावाची ओळख झाली. देशाच्या पंतप्रधानपदी निवड होण्याची शक्यता आहे, हे समजल्यानंतरही अत्यंत संयमाने शुभेच्छाचा स्वीकार करणारे मनमोहन सिंग, तर दुसरीकडे अमेरिकेशी आण्विक करार करताना त्यांनी घेतलेली कठोर भूमिका भारतीय शास्त्रज्ञांना प्रभावित करून गेली. सुरेश कलमाडी यांच्या प्रचारार्थ पुण्यात आले असताना आपणही पंतप्रधानांच्या स्पर्धेत आहात, असे सांगणार्‍यांना आपल्यापुढे आणखी शंभर दिग्गज आहेत, असे उत्तर देत वास्तवाची जाणीव करून देणारा हा नेता कार्यकर्त्यांशी बोलताना मात्र हळवा होतो… अशा कित्येक मनमोहक आठवणींना आज अनेकांनी उजाळा दिला.

पंतप्रधान कसा होईल; माझ्यापुढे शंभर लोक आहेत

मी पंतप्रधान होईलच कसा, मी त्या पदाच्या रेसमध्ये नाही. माझ्या पुढे शंभर लोक आहेत. जे पंतप्रधान होऊ शकतात. हे उद्गार आहेत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे. ते पुणे शहरात 2004 मध्ये खा. सुरेश कलमाडी यांच्या प्रचारार्थ आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर हे उत्तर दिले होते. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या आठवणींचे अनेक किस्से पुणे शहराशी निगडीत आहेत. ते शहरात जेव्हा जेव्हा आले तेव्हा लोकांना त्याच्या स्वभावातील साधेपणा जवळून अनुभवता आला. जगतविख्यात अर्थशास्त्रज्ञ, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर अशी ओळख असूनही अचानक राजकारणात आले आणि सलग दहा वर्षे देशाचे पंतप्रधानपद भूषवून अवघ्या जगात आपल्या विद्वत्तेसह शांत, संयमी व्यक्तिमत्वाची छाप पाडणारे डॉ. सिंग कसे होते हेच पुणेकरांनी सांगत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

तारा सिंग, निवृत्त शास्त्रज्ञ, एआरडीई, पुणेअसा झाला अणू करार, ज्याचा मी साक्षीदार झालो… डीआरडीओमधील निवृत्त शास्त्रज्ञ होतो. ही घटना 2007 सालची आहे. मी मूळचा पुणे शहरातला पण हैदराबाद येथील डीएमआरएल या डीआरडीओच्या संलग्न संस्थेतच शास्त्रज्ञ म्हणून काम करीत होतो. तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्यासोबत काम करायला मिळाले. त्यामुळे त्यांची ओळख होती. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अमेरिकेसोबत आण्विक करार करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. मात्र, काँग्रेस पक्षाला तेव्हा बहुमत नव्हते. सोबत डावे पक्षही सरकारमध्ये सहभागी होते. त्यांच्यासह विरोधी पक्षांचा या कराराला प्रचंड विरोध होता, तेव्हा डॉ. मनमोहन यांच्या पाठीशी डॉ. कलाम ठाम उभे राहिले. त्यांनी आमच्यासोबत चर्चा केली अन् सांगितले की, आपण शांततेच्या मार्गाने जाणारे आहोत. त्यामुळे हा करार झाला पाहिजे. तुम्ही मदत करा. यश मिळाले तर तुमचे अपयश मिळाले तर माझे. मग आम्ही तयारी सुरू केली.अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्यासमवेत तो करार होणार होता. त्यात डॉ. मनमोहन सिंग यांनी डावे पक्ष जे सरकारमध्ये सहभागी होते पण त्यांचा या कराराला विरोध होता, त्यांना आपली भूमिका समजावून सांगितली आणि विरोधी पक्षालाही सांगितली. माजी पंतप्रधान वाजपेयी यांनादेखील ती भूमिका तेव्हा पटली आणि तो करार अखेर 2008 मध्ये झाला. तेव्हा पंतप्रधान सिंग यांच्यातील शांत, संयमीपणा आम्ही अगदी जवळून पाहिला. विरोधकांचे ऐकून घेणे, त्यांना विचाराने जिंकणे ही कला त्यांच्यात होती. कमालीचा शांतपणा त्यांच्यात होता.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

हाँ, मैं पीएम होने जा रहा हूँ, हुआ तो नहीं!

डॉ. मनमोहन सिंग यांची 2004 मध्ये पंतप्रधानपदी निवड होण्याची प्रक्रिया सुरू असतानाची एक हृद्य आठवण ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल मणियार यांनी सांगितली. पंतप्रधानपदासाठी डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावाची चर्चा सुरू होताच ते थेट शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या बंगल्यावर आले होते. त्या वेळी आम्ही काही मित्र तेथेच होतो. डॉ. सिंग व पवारसाहेब यांची चर्चा संपल्यावर साहेबांनी आम्हाला बोलावून घेऊन त्यांची ओळख करून दिली. त्या वेळी मी डॉ. सिंग यांना ‘बधाई हो साहब’ अशा शुभेच्छा दिल्या. यावर ते म्हणाले, ‘काहे की बधाई’ मी म्हटलं, ‘आप प्रधानमंत्री होने जा रहे हो’! ‘हाँ, मैं होने जा रहा हूँ, हुआ तो नहीं’ असे मिश्किल उत्तर देऊन डॉ. सिंग म्हणाले, ‘अरे भाई यहाँ से वहाँ तक जाने के बीच में कुछ भी हो सकता है ‘! त्यावर मी म्हटलं ‘आपही प्रधानमंत्री बनेंगे! उसमें कोई संदेह नहीं!’

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन