बिहारच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. कारण, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहार भाजपने मोठा निर्णय घेत, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाच बिहार विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला आहे.भाजपने म्हटले की, विधानसभा निवडणुकीआधी नितीश कुमार यांच्या नावावरच शिक्कामोर्तब झाला आहे. तर यामुळे हे दिसून येते की, बिहारमध्ये अजूनही नितीश कुमार यांचा प्रभाव कायम आहे.






सध्या नितीश कुमार हे ‘मिशन बिहार’वर निघाले आहेत. त्यांनी सोमवारी ‘प्रगती यात्रा’च्या पहिल्या टप्प्याची सुरुवात पश्चिम चंपारणमधून केली. खरंतर या यात्रेच्या सुरुवातीस राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा आणि सम्राट चौधरी दिसून आले नाहीत.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या यात्रेची सुरुवाती बेतियामधील वाल्मिकी नगरच्या घोटवा टोला येथून केली. ते या दरम्यान विविध भागांमध्ये केले आणि लोकांची मतं जाणून घेतली. तसेच, या यात्रेदरम्यानच मुख्यमंत्री नितीश कुमारांनी विविध योजनांचे भूमिपूजन अन् उद्गघाटनही केले. या यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री नितीश कुमार हे महिलावर्गाशीही संवाद साधत आहेत. त्यांच्या समस्या ऐकत आहेत आणि त्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशही देत आहेत. यात्रेच्या पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री 23 ते 28 डिसेंबरपर्यंत सहा जिल्ह्यांमध्ये जातील.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या एका वक्तव्यामुळे बिहारमध्ये एनडीए आघाडीत हालचाली वाढल्या. अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात म्हटलं होतं की, बिहारमध्ये पुढील निवडणूक कोणचा चेहरा पुढे करून लढवली जाईल, याचा निर्णय भाजप आणि जेडीयू यांच्या बैठकीत होईल. ही बातमी बिहारमध्ये पोहचली आणि तेथील राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला. बैठकांचा सपाटा सुरू झाला आणि या बैठकानंतर असे सांगितले गेले की, पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार हेच एनडीए आघाडीचा चेहरा असतील आणि मुख्यमंत्री देखील तेच बनतील.











