काठमांडूतील माओवाद्यांच्या बैठकीत काय प्लॅन ठरला, महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं तर…

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत जोडो यात्रेत शहरी नक्षलवाद्यांचा समावेश असल्याचा आरोप विधानसभेत केला होता. त्यासोबतच काठमांडूमध्ये पार पडलेल्या माओवाद्यांच्या एका बैठकीचा उल्लेख केला होता. या बैठकीत महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्याबाबत चर्चा झाली होती, असंही त्यांनी म्हटलं होतं. एबीपी माझाला या बैठकीबद्दलची एक्सक्लुझिव्ह माहिती समोर आली आहे.

12 ते 14 नोव्हेंबरदरम्यान काठमांडूतल्या कांतीपूरमध्ये माओवाद्यांची उच्चस्तरीय बैठक झाली. महाराष्ट्रात महायुतीचा विजय झाल्यास सरकारविरोधी वातावरण कसं तयार करायचं यावर बैठक मंथन झाल्याची माहिती समोर आली आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या या बैठकीत माओवाद्यांचे भारत, नेपाळ, बांगलादेशमधील सदस्य हजर होते. त्यात महाराष्ट्रात महायुतीचा विजय झालाच तर पुढची रणनीती काय असेल, यावर सखोल चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

अधिक वाचा  दिवाळीचा पुणे मेट्रोला ‘झटका’! आर्थिक गणित बिघडले प्रवासी संख्या २.३६ लाखांवरून थेट १२ हजारांवर

नेमकं प्रकरण काय?

विधानसभेत शहरी नक्षलवाद आणि ईव्हीएम संदर्भात सभागृहाला माहिती देताना काठमांडूमध्ये पार पडलेल्या एका बैठकीचा उल्लेख केला. या बैठकी संदर्भात एबीपी माझाने काही एक्सक्लुझिव्ह माहिती मिळवली आहे. 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान काठमांडूमधील कांतीपुर भागात माओवाद्यांची अत्यंत उच्चस्तरीय बैठक पार पडली. ही बैठक माओवाद्यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील टॉप कमांडर साठीची होती. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी च्या भारत, नेपाळ, बांगलादेश आणि मणिपूर ( कम्युनिस्ट पार्टी ऑफ माओवादीचा मणिपूर युनिट भारताच्या युनिट पेक्षा वेगळा आहे..) मधील काही निवडक कॉम्रेड्स या बैठकीत उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या निवडणुकीत ही भाजप आणि महायुतीचा विजय झाला, तर…-

धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेस आणि राहुल गांधींनी देशभरात आयोजित केलेल्या भारत जोडो अभियानाशी जोडलेले आणि नंतर महाराष्ट्राच्या निवडणुकीत संविधान बचावचा नारा देत अनेक ठिकाणी व्याख्यान देणारे एक बुद्धिजीवी यांच्या सह महाराष्ट्रातून किमान चार ते पाच जण या माओवाद्यांच्या कथित बैठकीत उपस्थित असल्याची माहिती आहे. हरियाणा नंतर महाराष्ट्राच्या निवडणुकीत ही भाजप आणि महायुतीचा विजय झालं, तर पुढील नियोजन काय करायचं यावर या बैठकीत सखोल मंथन झालं होतं. सर्व प्रयत्नानंतरही जर भाजप आणि महायुतीचा महाराष्ट्रात विजय झालंच तर खापर ईव्हीएम वर फोडायचं हे याच बैठकीत ठरलं होतं. या बैठकीनंतर आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुढील कालावधीसाठी जे निर्देश माओवाद्यांना मिळाले आहेत, ते अत्यंत खळबळजनक आहेत.

अधिक वाचा  बळीराजाचा आयुष्य चिंतेच अन् दादा तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात लावणी…. महिलेचे ठुमके…. मस्त चाललय तुमचं!

बैठकीत माओवाद्यांना पुढील निर्देश देण्यात आले-

1) पहिल्या टप्प्यात प्रसारमाध्यम आणि समाज माध्यमातून ईव्हीएम विरोधात जोरदार आरोप करत संशयाचा वातावरण निर्माण करा..

2) दुसऱ्या टप्प्यात ईव्हीएम विरोधात फक्त महाराष्ट्र नाही तर देशातील इतर राज्यातूनही आवाज बुलंद करून निवडणुका ईव्हीएम द्वारे नव्हे तर बॅलेट पेपर द्वारे घेण्यात यावी असे आंदोलन उभे करा.

3) त्यानंतर महाराष्ट्रातील विद्यमान महायुती सरकारपासून रुष्ट असलेल्या वेगवेगळ्या समाज घटकांना (खासकरून मुस्लिम, दलित आणि ओबीसी मधील सरकारवर नाराज) रस्त्यावर उतरवून महाराष्ट्रात सरकार विरोधी वातावरणाला हवा द्या.

4) चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे असं सांगून विद्यमान सरकार विरोधात रस्त्यावर आरपारची लढाई ( हिंसक आंदोलन ) उभे करा…,असे निर्देश काठमांडूच्या मीटिंग नंतर माओवाद्यांच्या टॉप कमांडर्सनी आपल्या कॅडरला दिल्याचे समजते आहे.

अधिक वाचा  महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण दुर्देवी न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार