पुणे: राज्यात मागील काही दिवसांपासून अल्पवयीन मुली, महिला यांच्यावर होणाऱ्या अत्याचारामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं चित्र आहे. बदलापूर, मंबई, अकोला, पुणे या ठिकाणी देखील शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुली, स्कुलबस मधून जाताना, रिक्षातून जाताना अशा अनेक ठिकाणी लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना ताज्या असतानाच आता पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी परिसरातील एका शाळेत तीन विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.शाळेतील ॲडमिन ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका नराधम कर्मचाऱ्यानी शाळेतील तीन विद्यार्थिनी विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारीवरून नराधम सरफराज मन्सूर शेख या 32 वर्षाच्या शाळेतील कर्मचाऱ्यावर दापोडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधी दरम्यान सरफराज मन्सूर शेख या शाळेच्या ॲडमिन ऑफिसमध्ये काम करतो. शाळेतील तीन विद्यार्थिनींचे वेगवेगळ्या दिवशी बॅड टच करून विनयभंग केल्याची माहिती आहे. त्यावर न थांबता आरोपीने तीन विद्यार्थी पैकी एका विद्यार्थिनीचा घरापर्यंत पाठलाग देखील केला. विद्यार्थिनींनी हा सर्व प्रकार आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकाला सांगितल्यानंतर शाळेतील मुख्याध्यपकाच्या तक्रारीवरून दापोडी पोलिसांनी तातडीने सरफराज मन्सूर शेख विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
साॅफ्टवेअर इंजिनियरचे पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य
साॅफ्टवेअर इंजिनियर असलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साॅफ्टवेअर इंजिनियर असलेल्या पतीनेच आपल्या पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य केलं आहे. तसेच त्याने तीन जणांना वेगवेगळ्या दिवशी पत्नीवर लैंगिक अत्याचार करण्यास सांगून त्याचे अश्लिल चित्रीकरण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पुनावळे येथे सप्टेंबर 2023 ते 6 एप्रिल 2024 या कालावधीत ही घटना घडल्याचं पीडित पत्नीने फिर्यादीत म्हटलं आहे
बोपदेव घाटात मुलीवर सामूहिक अत्याचार
पुण्यातील बोपदेव घाटात रात्री आपल्या मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या एका 21 वर्षीय तरुणीवर आणि तिच्या मित्रावर हल्ला केला. शस्त्राचा आणि लाकडी दांडक्यांचा धाक दाखवत त्यांच्याजवळ असेलल्या वस्तू घेऊन तरूणाला झाडाला बांधून ठेवण्यात आलं तर तरूणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केला. या घटनेतील तीन आरोपी फरार होते, घटनेची सखोल चौकशी सुरु होती. आता अखेर पोलिसांच्या हाती मोठे यश लागले आहे. याप्रकरणी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.