राज्यसभेत रणकंदन, सभापती जगदीश धनखड अन् मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात जोरदार बाचाबाची

0

राज्यसभेत सभापती जगदीश धनखड यांच्यावर अविश्वास प्रस्ताव विरोधकांनी आणला आहे. त्यावरुन शुक्रवारी जोरदार गदारोळ झाला. सभापती जगदीश धनखड आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात बाचाबाची झाली. जगदीश धनखड म्हणाले, एक शेतकऱ्यांचा मुलगा या पदावर बसल्याचे तुम्हाला सहन होती नाही. त्यावर मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, तुम्ही जर शेतकऱ्याचा मुलगा असाल तर मीही मजुराचा मुलगा आहे. राज्यसभेत गदारोळ सुरुच राहिल्यामुळे कामकाज तहकूब करावे लागले. आता सोमवारी राज्यसभेचे कामकाज होणार आहे.

राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या विरोधात सभागृहात अविश्वास प्रस्ताव आणला गेला आहे. आपल्या विरोधात आणला जाणारा अविश्वास प्रस्ताव आणि पक्षपाती असल्याचे धनखड यांनी सांगितले. ते म्हणाले, मी तुम्हाला विचार करायला सांगत आहे. तुमची देहबोली पहा आणि तुम्ही काय म्हणत आहात याकडे लक्ष द्या. मी आतापर्यंत खूप सहन केले. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी दुर्बल होणार नाही. मी या देशासाठी मरेन. शेतकऱ्याचा मुलगा या पदावर का बसला आहे. त्याचा तुम्ही विचार करत नाही. आजचा शेतकरी हा केवळ शेतीपुरता मर्यादित नाही. धनखड म्हणाले, तुम्ही आधी नियम वाचा. अविश्वास प्रस्ताव आणला तर तो 14 दिवसांत येईल. मी तुम्हाला वेळ काढून मला भेटण्याची विनंती करतो. तुम्ही येत नसाल तर मी येईल.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

मी ही मजुराचा मुलगा
राज्यसभेचे कामकाजही सुरू झाल्यानंतर प्रचंड गदारोळ विरोधकांनी केला. त्यावर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड विरोधकांवर नाराज झाले. ते संतापात म्हणाले, मी तुला खूप सहन केले. पण शेतकऱ्याचा मुलगा असल्याने तुला सहन होत नाही. यावर काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, तुम्ही जर शेतकऱ्याचा मुलगा असाल तर मीही मजुराचा मुलगा आहे.

जगदीश धनखड म्हणाले, तुम्ही माझ्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. तो तुमचा अधिकार आहे. परंतु तुम्ही राज्यघटनेची पायमल्ली करत आहात. तुम्ही आमच्या अविश्वास प्रस्तावाचे काय झाले? असे वक्तव्य करत आहात. तुमचा प्रस्ताव आला आहे, आता 14 दिवसानंतर त्यावर निर्णय होईल.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

दरम्यान भाजपने राज्यसभेतील आपल्या खासदारांनी व्हिप जारी केला आहे. 16 आणि 17 डिसेंबर 2024 रोजी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी तीन लाईनचा व्हिप जारी केला आहे.