शरद पवार आणि अजितदादा एकत्र येणार?; रोहित पवारांच्या आईच्या विधानाने चर्चांना उधाण

0

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा काल वाढदिवस होता. त्यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दिल्लीतील निवासस्थानी जात भेट शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार का? याबाबतची चर्चा महाराष्ट्रात होऊ लागली. यावरच कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही 20 ते 25 डिसेंबर या काळात पुण्यातील शिवाजीनगर भागात ‘भीमथडी जत्रा’ आयोजित केली आहे. या यात्रेच्या निमित्ताने सुनंदा पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारण्यत आला. तेव्हा यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं सुनंदा पवार म्हणाल्या.

अधिक वाचा  EVM मध्ये नावाचा क्रम बदलला, पक्षांची मक्तेदारी की सुलभता? पक्ष आणि उमेदवारांची अशी दिसणार नावं!

अजितदादा- पवारांच्या भेटीवर काय म्हणाल्या?
शरद पवार आणि अजित पवारांच्या कुटूंबीयांची भेट ही राजकीय नसून कौटुंबिक भेट होती. दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येण्याची गरज आहे, मूठ घट्ट राहिली ताकत वाढणार आहे. सत्तेसोबत जायचं का याबाबत शरद पवार निर्णय घेणार आहेत. कुटूंब म्हणून आता एकत्र येण्याची गरज आहे.राष्ट्रवादीत आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज आहे, असं सुनंदा पवार म्हणाल्या आहेत.

आम्ही सर्व आमदारांना निमंत्रण देत असतो, यामध्ये आम्ही राजकारण आणत नाही. शरद पवार दरवर्षी जत्रेला भेट देत असतात, यावर्षी पण देणार आहेत. महिला बचत गटाच्या पाच महिलांच्या हस्ते उदघाटन करण्याचा आमचा विचार आहे. मुंबईत भीमथडी जत्रा करण्याचे नियोजन आहे, असं सुनेत्रा पवारांनी सांगितलं आहे.

अधिक वाचा  भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनात साम्य आहे – राजेश घाडगे

भीमथडी जत्रेबाबत काय म्हणाल्या?
भीमथडी जत्रेच्या संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतील. 20 ते 25 तारखेदरम्यान भीमथडी जत्रा असणार आहे. या भीमथडी यात्रेत सव्वा तीनशे स्टॉल असणार आहेत. 18 राज्यातील महिला यामध्ये सहभागी होणार आहेत. गेल्या 18 वर्षांपासून जत्रा सुरु आहे. या जत्रेच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे. दीड लाख पर्यटक यामध्ये सहभागी होत असतात. याचं सर्व श्रेय महिला बचत गटांना आहे. यंदाची जत्रा आप्पासाहेब पवार यांना समर्पित करणार आहोत. यावेळच्या भीमथडी जत्रेचं बजेट सव्वा दोन कोटी असणार आहे, असं सुनेत्रा पवारांनी सांगितलं.

अधिक वाचा  भाजप-शिवसेना युती तुटण्याच्या स्थितीत! राजकीय भूकंपही शक्य? एकनाथ शिंदेंची किंमत फक्त १२ जागा