महाराष्ट्राच्या राजकारणातला नवा अध्याय, शिंदे मुंबईत तर फडणवीस-अजित पवार दिल्लीत, महायुतीत काय सुरु?

0

महाराष्ट्रात सत्ता स्थापन होऊन 6 दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पण राज्य सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीत काही खात्यांवरुन असमन्वय असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे भाजपची यादीदेखील अद्याप फायनल झाली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. खातेवाटपाचा तिढा न सुटल्यामुळे दिल्लीत बैठक होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी दिल्लीत दाखल होऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आणखी काही ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची माहिती आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

दुसरीकडे अजित पवार देखील दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे. खातेवाटपाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आज महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. पण या बैठकीला एकनाथ शिंदे जातील का? याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. दरम्यान, महायुतीच्या तीनही प्रमुख नेत्यांची उद्या मुंबईत खातेवाटपावर चर्चा करण्यासाठी बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत खातेवाटपावर अंतिम निर्णय होतो का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांची भेट
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा दिल्लीला गेले आहेत. तर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांची काल भेट झाल्याची माहिती आहे. महायुतीत काही खात्यांवरुन समन्वय नाही आणि त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याची चर्चा आहे. भाजपची अद्यापची देखील मंत्रिमंडळाची यादी तयार झालेली नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर पुढच्या एक ते दोन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होणार, असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदा नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गेले होते. त्यावेळेला गडकरींकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

दिल्लीत आज रात्री बैठक होण्याची शक्यता
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे हे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. महायुतीच्या खातेवाटपावर आज दिल्लीत बैठकीची शक्यता आहे. त्यासाठीच आज देवेंद्र फडणवीस आणि नंतर अजित पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. या दोन्ही नेत्यांची आज रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होऊ शकते. खातेवाटपाचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. तसेच एकनाथ शिंदे हे दिल्लीत बैठकीसाठी जाणार की नाहीत याबाबतही सस्पेन्स कायम आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता