कुर्ल्यातील बस अपघातात 19 वर्षीय तरुणीचा करुण अंत; नोकरीचा पहिला दिवस भरुन घरी परतण्यासाठी निघाली अन्…

0

कुर्ला पश्चिमेला सोमवारी रात्री झालेल्या अपघातामुळे संपूर्ण मुंबई हादरली. कुर्ल्यात भरधाव वेगाने आलेल्या एका बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने अनेक वाहनांना धडक देत नागरिकांना चिरडलं. या अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला. तर 43 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील जखमींवर भाभा रुग्णालय, सायन रुग्णालय यांसह काही खासगी रुग्णालयातही उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये १९ वर्षीय आफरीन शाह या तरुणीचाही समावेश आहे. आफरीनच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

कुर्ल्यात झालेल्या बेस्ट बस अपघातात एका 19 वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला. विशेष म्हणजे तिच्या आयुष्यातील पहिल्या नोकरीचा पहिला दिवस तिच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला. आफरीन शाह असे या तरुणीचे नाव आहे. कुर्ल्यातील भाभा रुग्णालयाने तिला मृत घोषित केले.

अधिक वाचा  भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनात साम्य आहे – राजेश घाडगे

कुर्ल्यात राहणारी १९ वर्षीय आफरीन शाहच्या नोकरीचा काल पहिला दिवस होता. डोळ्यात मोठी स्वप्न घेऊन ती तिच्या नोकरीसाठी गेली. तिने नोकरीचा पहिला दिवस भरला. यानंतर तो आटोपून तो घरी परतण्यास निघाली. मात्र तोच काळाने तिच्यावर घाला घातला. तिच्या नोकरीचा पहिला दिवसच तिच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला.

नेमकं काय घडलं?
आफरीन घरी परतण्यास निघाली. त्यानंतर ती कुर्ला स्थानकात उतरली. तिथे उतरुन तिने तिचे वडील अब्दुल सलीम यांना फोन केला. तिने वडिलांना स्टेशनला घ्यायला या, असे सांगितले. त्यावेळी तिच्या वडिलांनी तू कुर्ला स्थानकातून चालत थोडं पुढे ये, असे सांगितले. वडिलांनी सांगितल्यानुसार ती कुर्ला स्थानकातून बाहेर आली. त्यानंतर ती चालत होती. याचदरम्यान मागून येणाऱ्या भरधाव बसने तिला उडवले. यानंतर आफरिनला तात्काळ भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याआधीच तिचा मृत्यू झाला.

अधिक वाचा  पवारांना सोडताच प्रशांत जगतापांचा पक्ष अन् 2029 चे मोठे लक्ष्य ठरल; मुंबईत यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश?

आफ्रिनचे वडील तिला घरी आणण्यासाठी निघाले होते. पण त्यांना मुलीचा मृतदेह घेण्यासाठी रुग्णालयात जावे लागले. या दुर्घटनेनंतर आफ्रिनच्या वडिलांनी आरोपी बस चालकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

कुर्ला बस अपघातात 7 जणांचा मृत्यू

सोमवारी रात्री 9.50 च्या सुमारास कुर्ला पश्चिमेकडील अंजुम-ए-इस्लाम शाळेजवळील एसजी बारवे रोडवर एक बस सुसाट वेगाने आले. यानंतर भरधाव वेगाने येणारी अनियंत्रित बस गर्दीत घुसली आणि ते पाहून लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. यावेळी अनियंत्रित झालेल्या भरधाव वेगाने आलेल्या बसने 30-40 गाड्यांना जोरदार धडक दिली. यावेळी रिक्षा, दुचाकी तसेच रस्त्यावर अनेक नागरिकांना या बसने चिरडले. त्यामुळे काही नागरिक जखमी झाले. तर काहींना यात जीव गमवावा लागला.

अधिक वाचा  बालेकिल्ला ‘अबाधित’साठी सर्व प्रभागात २/१ चेहरे बदल? स्थानिकांची नवी रणनीती विद्यमान गॅसवर