महाराष्ट्र मध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या नंतर जनतेने भारतीय जनता पक्षाला बहुमत दिले असले तरी सुद्धा सत्ता स्थापना साठी होणारा विलंब आणि त्यानंतर जुळलेली गणित यामध्ये महायुती सरकार आगामी पाच वर्ष सत्तेत राहणार यावरती शिक्कामोर्तब झाले असले तरीसुद्धा आज अस्तित्वात आलेली महायुती 2.0 याची बीजे १३ वर्षांपूर्वी पुणे महापालिकेत ज्या अजित पवारांनी सर्वात प्रथम भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला त्याच अजित पवारांनी रोवली असल्याची आठवण याच शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने झाली आहे. अजित पवार हे शरद पवार यांचे पुतणे राजकारणात सक्रिय झाल्यापासून त्यांचे काँग्रेसशी कधी सुत जुळले का हाच प्रश्न निर्माण झाला? कायम सत्तेत एकत्र असतानाही काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेत त्यांनी आपले अस्तित्व आणि काँग्रेसला विरोध करण्याचे काम केले. संपूर्ण महाराष्ट्राला याची जाणीव नसली तरी पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानिक राजकारणाचा आढावा घेतल्यास अजित पवार आणि काँग्रेस यांचं नातं कसं होतं याची जाणीव तेरा वर्षांपूर्वी राबविण्यात आलेल्या पुणे पॅटर्न मुळे सर्वांनाच आहे. सत्तेची गणित कशी जुळवायची याची वेगळी शिकवण अजितदादांना देण्याची गरज नाहीच! 2024 चा निकाल जाहीर होताच शिवसेनेच्या अगोदर भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देत अजित पवार यांनी सरशी घेतली आणि महायुतीमध्ये शिवसेनेला सहभागी होण्याशिवाय पर्याय नाही हा मोठा संदेश देण्यात आला.






भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमत असतानाही निवडणूक पूर्व युतीचा भाग म्हणून आज राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेणे भारतीय जनता पक्षाला क्रम प्राप्त करण्यासाठी अजित पवार यांनी सर्वप्रथम पाठिंबा जाहीर करून एक पाऊल पुढे टाकले आणि शिवसेनेची वर्गणी बार्गनिग कमी करत महायुती 2.0 यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हक्काची खाते मिळवण्यासाठी आग्रही असतानाच अजित पवार यांनी केलेल्या या खेळीमुळे भारतीय जनता पक्षाला शिवसेनेची तडजोड करण्यासाठी खूप मोठी ताकद मिळाली. आज महायुती 2.0 शाही शपथविधी पार पडत असतानाही शिवसेनेच्या हातामध्ये मात्र सहभागी होण्याशिवाय काहीही उरले नाही. माध्यमांवर सध्या शिवसेनेतर्फे उपमुख्यमंत्री कोण बसणार याची चर्चा रंगत असली तरी अजित पवारांच्या या अनोख्या खेळीमुळे शिवसेनेला सत्तेत सहभागी होण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही.
पुणे पॅटर्न असा होता-
2007 साली अजित पवार यांनी सत्तेसाठी आणि इगोखातर काँग्रेसला दूर ठेवण्यासाठी ‘पुणे पॅटर्न’ भाजप आणि शिवसेनेच्या मदतीने साकारला त्याचप्रमाणे 2019 ला देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसलाच सत्य पासून दूर ठेवण्यासाठी पहाटेचा शपथविधी आणि नंतर महायुती सरकार असा पुणे पॅटर्न राबवला. 2007 साली सुरेश कलमाडी यांना बाजुला ठेवण्याची अजितदादा पवार यांची खेळी यशस्वी झाली त्याप्रमाणेच एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे 2022 साली राज्याच्या सत्तेतून काँग्रेस बाहेर पडली. 2007 साली 144 जागांपैकी काँग्रेसला 42 जागा असतानाही राष्ट्रवादीने 48 जागा आणि भाजपला 25, शिवसेनेला 21 च्या मदतीने ‘पुणे पॅटर्न’ साकारले. राष्ट्रवादीनं महापौरपद स्वत:कडे उपमहापौरपद शिवसेनेकडे ठेवलं तर भाजपला शिक्षणमंडळ दिलं.
लोकसभा निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र लढवायची असल्यानं पुणे पॅटर्नवरही गंडांतर आलं होतं. त्याप्रमाणेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकालानंतर अजित पवार यांचा समावेश या मुद्द्यावर ‘महायुती’ धोक्यात येईल असेही वाटत होते. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारने कमाल करून प्रचंड बहुमत मिळवले आहे आणि पारंपारिक सहकारी मित्रपक्ष शिवसेनेपेक्षा अजित पवार हेच भाजपला अत्यंत जवळचे झाले आहेत. शिवसेनेनं ऐनवेळी हिसका दिलाच तर राष्ट्रवादी हक्काचा मित्र पक्ष तयार करून ठेवला आहे. तेरा वर्षांपूर्वी सत्तेसाठी आणि इगोखातर लोक कोणत्याही स्तराला जाऊ शकतात हे पुणे पॅटर्नमधून समोर आलं होते आणि आजही महायुती 2.0 मध्ये हेच सिद्ध होत आहे.











