पहिल्या कौलमध्ये आघाडीवर असलेले उमेदवार ; बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी तर अमित ठाकरे…

0

राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येत असून पोस्टल मतमोजणीने मतदान निकालाची सुरुवात झाली असून पोस्टल मतदानात कोणी आघाडी कोण पिछाडीवर आहे, याचा पहिला कौल समोर आला आहे. सुरुवातीच्या हातील आलेल्या कलानुसार महायुतीने पहिल्या कौलमध्ये 92 जागांवर आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. तर, 75 जागांवर महाविकास आघाडीने (MVA) आघाडी घेतली असून इतरमध्ये 13 उमेदवार आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे, भाजप मोठ्या पक्षाच्या दिशेने वाटचाल करत असून आघाडीत भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. हाती आलेल्या पहिल्या कलनुसार 15 उमेदवारांचे हाती आलेले कल पाहूयात. त्यामध्ये, राज्याचं लक्ष लागेलल्या बारामती व कर्जत जामखेड मतदारसंघात पवार बंधू आघाडीवर आहेत. तर, माहीममधून राजपुत्र अमित ठाकरे आघाडीवर असल्याची माहिती आहे. कणकवली मतदारसंघातून नितेश राणे आघाडीवर आहेत.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

बारामती मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार आघाडीवर आहेत. तर, कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार आघाडीवर आहेत. त्यामुळे येथील मतदारसंघातील उत्सुकता आणखी वाढली आहे,.

पहिल्या कौलमध्ये आघाडीवर असलेले उमेदवार

1.बारामती विधानसभा मतदारसंघात पहिल्याच कौलमध्ये युगेंद्र पवार आघाडीवर असल्याची माहिती आहे.
2.कागल मतदारसंघातून हातील आलेल्या पहिल्या कौलनुसार हसन मुश्रीफ आघाडीवर असल्याची माहिती आहे.
3.साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर आहेत, पहिला कौल हाती आला असून महायुतीला बढत दिसून येते
4.दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नरहरी झिरवळ आघाडीवर आहेत
5.कुलाबा मतदारसंघात भाजप महायुतीचे राहुल नार्वेकर आघाडीवर आहेत, पहिला कौल त्यांच्या बाजुने
6.मुंबईतील माहीम मतदारसंघातून मनेस प्रमुख राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे आघाडीवर असून हा पहिला कौल आहे.
7.सांगोल्यात शहाजी बापू पिछाडीवर असून शेकापचे बाबासाहेब देशमुख आघाडीवर असल्याची माहिती आहे.
8. पंढरपूर मतदारसंघातून काँग्रेस महाविकास आघाडीचे भगिरथ भालके आघाडीवर आहेत.
9. भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून आघाडीवर आहेत, पोस्टल मतमोजणीचा हा कौल आहे.
10. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील आघाडीवर आहेत, पोस्टल मतांमध्ये नाना पटोलेंना आघाडी मिळाली आहे.
11. विदर्भातील बडनेरा मतदारसंघात आमदार रवि राणा आघाडीवर आहेत. पोस्टल मतमोजणीमध्ये त्यांना आघाडी आहे.
12. पुण्यातील भोसरी मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार महेश लांडगे आघाडीवर आहेत.
13. बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघात भाजप महायुतीचे सुरेश धस आघाडीवर आहेत, येथे मेहबुब शेख पिछाडीवर आहेत.
14. भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे पोस्टल मतदानावर कामठीतून आघाडीवर आहेत
15. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात टपाली मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भाजपच्या देवयानी फरांदे आघाडीवर तर, ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते पिछाडीवर आहेत.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती