मोठी बातमी: माहीम विधानसभेतून अमित ठाकरे आघाडीवर, मनसे सुस्साट!

0

पोस्टल मतमोजणीच्या कलानुसार मनसेचे उमेदवार दोन जागांवर आघाडीवर आहेत. आतापर्यंत 100 जागांचे कल हाती आले आहेत. त्यामध्ये महायुती 54, मविआ 42 जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये भाजप 33, शिंदे गट 9, अजितदादा गट 12, काँग्रेस 15, ठाकरे 14 आणि शरद पवार गट 14 जागांवर आघाडीवर आहेत. तर मनसेचे दोन उमेदवार आघाडीवर असल्याचे समजते. वंचित बहुजन आघाडीला अद्याप खाते खोलता आलेले नाही. तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारही अद्याप पिछाडीवर असल्याचे चित्र आहे.

मनसे एकूण तीन जागांवर आघाडीवर

सध्या विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी होत आहे. मतमोजणीच्या पहिल्याच कलात मनसे मुसंडी मारताना दिसतेयत. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार मनसे एकूण तीन जागांवर आघाडीवर आहे. यात माहीम या मतदारसंघाचाही समावेश आहे. माहीम या जागेवर राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यामुळे ही जागा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय होती. असे असतानाच आता पहिल्या कलात माहीममधून अमित ठाकरे आघाडीवर आहेत. यासह इतरही दोन जागांवर मनसे पक्षाचे उमेदवार अघाडीवर आहेत.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

माहीममध्ये कोणाकोणात लढत?

माहीम या मतदारसंघात तिहेरी लढत झाली. या मतदारंसघातून अमित ठाकरे निवडणूक लढवत असल्यामुळे त्याची राज्यभरात चर्चा होती. याच जागेवर महायुती आणि महाविकास आघाडीनेही आपला उमेदवार दिला होता. त्यामुळे ही जागा जिंकण्यासाठी अमित ठाकेर यांनी जावाचं रान करत प्रचार केला होता. महायुतीकडून या जागेवर सदा सरवणकर यांनी निवडणूक लढवली. तर महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे महेश शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे या जागेवर कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

भाजपाची पाठिंबा देण्याची भूमिका पण…

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपा, महायुतीला जाहीर बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्याची परतफेड करण्याची भूमिका भाजपाने घेतली होती. या जागेवर महायुतीचा उमेदवार उभा करू नये, असे भाजपाच्या काही नेत्यांचे म्हणने होते. पण शिंदे यांच्या शिवसेनेचे सदा सरवणकर यांनी माघार घेण्यास नकार दिला. त्यामुळेच या जागेवर तिहेरी लढत झाली. येथून आता कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.