खडकवासला विधानसभा मतदारसंघ प्रथम आमदार म्हणून स्वर्गीय रमेश भाऊ वांजळे यांचं नाव घेतलं जातं परंतु दुर्दैवाने त्यांना अपघाती निधनाला सामोरे जावे लागले; त्यानंतर संपूर्ण धक्कादायकपणे वांजळे परिवाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘रामराम’केला स्वर्गीय रमेश भाऊ वांजळे यांचे बंधू यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, पुणे महानगरपालिका नगरसेवक अशी विभिन्न पदे वेगवेगळ्या पक्षातून पदरी पडल्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण वांजळे स्वर्गीय रमेश भाऊंना श्रद्धांजली या आशयाने मतदारसंघांमध्ये सहानुभूती मिळवण्याची एक अनोखी रचना तयार केली आहे. मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या धर्मपत्नी शर्मिला वहिनी ठाकरे यांच्यासमोर संपूर्ण कुटुंबीयांचे पाणी डोळे पाणावणे आणि त्यानंतर जयंतीनिमित्त संपूर्ण मतदार संघ शोकाकुल असल्याची ‘फलकबाजी’मुळे वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न जरी करण्यात आला असला तरी सुद्धा वांजळे परिवारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना का सोडली? इतर पक्षात विभिन्न पदे उपभोगली अन् संधी मिळताच पुन्हा मनसेत घर वापसी का केली? ही मतदारसंघात सुरू असलेली चर्चा याची उत्तरे जाहीर सभेतून मिळणार का?






संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे स्वर्गीय रमेश वांजळे यांच्या आठवणींना उजाळा देतात परंतु या तेरा वर्षाच्या कालखंडामध्ये कधीही वांजळे परिवारांची त्यांची असलेली सलगी किंवा कौटुंबिक भेट संपूर्ण मतदारसंघांनी पाहिली नाही किंवा वांजळे परिवार ही त्यांच्या भेटीस गेल्याचे पाहिले नाही. स्वर्गीय आमदार रमेश वांजळे यांचे निधन झाल्यानंतर संपूर्ण परिवाराने पक्षाला राम राम का केला? रमेश वांजळे यांच्या मृत्यूचे खरे कारण काय? आणि अत्यंत प्रिय असलेल्या स्वर्गीय रमेश वांजळे यांच्या कुटुंबीयांना मनसेपासून एवढ्या दिवस दूर का राहावं लागलं? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या ‘राजगर्जने’मध्ये मिळतील का अशी चर्चा मतदारसंघांमध्ये सुरू झाली आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघात सन 2009 साली विजय मिळवल्यानंतर 2014 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या मतदारसंघांमध्ये नशीब आजुन आजमावण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु रमेश वांजळे यांच्यासारखा प्रतिसाद न मिळाल्यामुळे पदरी दारूण पराभव मिळाला. 2019 मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये जाहीर पाठिंबा दिला असल्याने पुणे जिल्ह्यातील एकमेव कोथरूड वगळता अन्यत्र उमेदवार न दिल्याने मन सैनिकांच्या पदरी निराशा आली होती. 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने खडकवासला विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा महाराष्ट्र निर्माण सेना आणि वांजळे परिवार एकत्र निवडणूक लढवत आहे. तब्बल 13 वर्षानंतर सहानुभूती आणि मनसैनिकांचा जुळलेलं नातं भारतीय जनता पक्षाला आव्हान देणार की विरोधकांच्या मतांमध्ये दुफळी करून भाजपाचा विजय सुकर करणार हा खरा उत्सुकतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.










