विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये ‘मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ’, जयंत पाटलांनी काढला चिमटा

0

विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागला. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रचाराचा धुराळा उडाला आहे. मिरज विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. या सभेत खासदार विशाल पाटील (Vishal Patil) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी रंगल्याचे दिसून आले.

या प्रचार सभेत विशाल पाटील यांनी कोणी काही बोललं तरी मिरज विधानसभेत मशाल सोबत विशाल पण आहे. शिवाय हातात घड्याळ पण आहे आणि हातात मशाल पण आहे असे विधान केले. यानंतर जयंत पाटलांनी आपल्या भाषणात विशाल पाटील यांना चिमटा काढला.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

…तर विशाल पाटलांचे मताधिक्य दीड लाखाने वाढले असते

विशाल पाटील अपक्ष उमेदवारीच्या नादाला लागण्याऐवजी जर तुतारीच्या नादाला लागले असते तर त्यांचे मताधिक्य आणखीन दीड लाखाने वाढले असते, असे जयंत पाटील म्हणाले. तसेच आमचे घड्याळ चिन्ह चोरीला गेले आहे. मात्र पृथ्वीवर एकमेव असा पक्ष आहे की, ज्या पक्षाला घड्याळ चिन्ह मिळाले असले तरी त्याच्या खाली चिन्ह न्यायप्रविष्ठ असल्याचे लिहावे लागतंय असे म्हणत जयंत पाटील यांनी अजित पवार यांना टोला लगावला.

मिरज विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत

दरम्यान, मिरज विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून मोहन वनखंडे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत मिरज विधानसभा मतदारसंघावरून पेच निर्माण झाला होता. मात्र मोहन वनखंडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. आता या मतदारसंघात भाजपचे सुरेश खाडे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे तानाजी सातपुते विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे विज्ञान माने यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. मिरजमध्ये नेमकी कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा