पुणे कोथरूडमधील व्यावसायिकाची बिहारमध्ये हत्या; विमानतळावर अपरहण मृतदेह राष्ट्रीय महामार्ग- ३३ वर फेकून फरार

0
1

पुण्यातील व्यावसायिकाची बिहारमध्ये निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घोसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माननपूर गावाजवळ १२ एप्रिल रोजी सकाळी या व्यावसायिकाचा मृतदेह आढळून आला होता त्यामुळे एकच खळबळ उडाली.पोलिस तपास करत असता हा व्यावसायिक पुण्याचे असल्याचे उघड झाले. १४ एप्रिलला मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. लक्ष्मण साधू शिंदे असं या व्यावसायिकाचे नाव असून ते पुण्यातील एक प्रसिध्द व्यावसायिक होते. त्यांचा भंगाराचा मोठा व्यवसाय आहे.

पुण्यातील व्यावसायिकाची बिहारच्या पाटण्यात हत्या करण्यात आली. गळा दाबत ५५ वर्षीय व्यावसायिक लक्ष्मण साधू शिंदे यांची हत्या केली. लक्ष्मण शिंदे हे पुण्यातील कोथरूडमध्ये राहत होते. सायबर चोरट्यांनी कंपनीच्या कामासाठी मेल करत त्यांना पाटण्यात बोलून घेतले आणि त्यांची हत्या केली. कंपनीचे काही टूल्स आणि मशीनरी स्वस्त भावात विकत देतो असा मेल आरोपींनी लक्ष्मण शिंदे यांना पाठवला होता. स्वस्तात मशिनरी मिळेल यासाठी शिंदे बिहारला गेले होते. पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यामध्ये शिंदे बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबाकडून देण्यात आली होती. सोमवारी पाटण्यात त्यांचा मृतदेह सापडला.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

तीन दिवसांपूर्वी जहानाबादमधील बंधुगंज एकंगरसराय रस्त्यावर घोसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माननपूर गावाजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी हा मृतदेह बेवारस असल्याचे समजून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मृतदेहाची ओळख पटताच एकच खळबळ उडाली. सायबर चोरट्यांनी व्यावसायिकाला पाटण्याला बोलावले होते. त्यानंतर एअरपोर्टवरून त्यांचे अपरहण करण्यात आले. अपरहणानंतर त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी पैसे देण्यास नकार दिला त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी शिंदे यांचा मृतदेह जहानाबाद जिल्ह्यातील घोसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील झुंकी आणि मानपूर गावादरम्यान येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग- ३३ वर फेकून फरार झाले.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

सुरूवातील पोलिसांना शिंदे यांचा मृत्यू रस्ते अपघातामध्ये झाला असावा असे वाटले. पण मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर त्यांची हत्या झाल्याचे उघड झाले. सध्या या हायप्रोफाईल हत्या प्रकरणाचा तपास पाटणा, जहानबाद आणि नालंदा पोलिस संयुक्तपणे करत आहेत. बिहारच्या स्पेशल टीमने या प्रकरणी ५ संशयितांना ताब्यात घेतले आहे. हत्या झाल्यानंतर बिहार पोलिसांच्या विशेष पथकाने ५ संशयितांना जेहानबाद आणि नालंदा या जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांची बिहार पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. शिंदे यांचा मृतदेह आणण्यासाठी पुणे पोलिस बिहारमध्ये दाखल झाले आहेत.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार