मनपा निवडणुका जाहीर, मतदान अन् निकालाची तारीख काय? असा असेल निवडणूक कार्यक्रम? वाचा सविस्तर….

0

राज्याचं लक्ष लागलेल्या मनपा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे आजपासून राज्यात आचारसंहिता देखील लागू झाली आहे. निवडणूक आयोगने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात १५ जानेवारी रोजी महानगरपालिकांसाठी मतदान होणार आहे. तर १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार असल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी पूर्वी कोणत्याही परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, आयोगाने नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. त्यानंतर आता मनपा निवडणूकदेखील जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुक होणार आहेत.

अधिक वाचा  भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनात साम्य आहे – राजेश घाडगे

कसा असेल मनपा निवडणुकीचा कार्यक्रम?

अर्ज भरण्याची तारीख – २३ ते ३० डिसेंबर २०२५

अर्जांची छानणी – ३१ डिसेंबर २०२५

अर्ज मागे घेण्याची मुदत – २ जानेवारी २०२६

अंतिम उमेदवार यादी – ३ जानेवारी २०२६

मतदानाची तारीख – १५ जानेवारी २०२६

निवडणुकीचा निकाल – १६ जानेवारी२०२६

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील २९ मनपासाठी एकाच दिवशी मतदान होणार असून यापैकी मुंबईत एक सदस्यीय, तर २८ मनपात बहुदस्यीय प्रणाली लागू असणार आहे. या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ ची मतदार यादी वापरली जाणार असल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. याशिवाय दुबार मतदारांच्या घऱी जाऊन व्हेरिफिकेशन करण्यात आलं आहे. त्यांच्याक त्यांच्याकडून हमीपत्र घेण्यात आलं आहे. त्यांच्या नावासमोर २ स्टार लावण्यात आल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

अधिक वाचा  बालेकिल्ला ‘अबाधित’साठी सर्व प्रभागात २/१ चेहरे बदल? स्थानिकांची नवी रणनीती विद्यमान गॅसवर

मनपा निवडणुकीसाठी २९० निवडणूक निर्णय अधिकारी, ८७० सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, १ लाख ९६ हजार ६०५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं आयोगानं सांगितलं आहे. तसेच स्टार प्रचारकांची संख्या २० वरून ४० करण्याची माहिती ही आयोगने दिली आहे. राज्यात एकून २९ मनपासाठी निवडणूक होणार असून २८६९ जागांसाठी मतदान होणार आहे. यापैकी १४४२ महिला, ३४१ एससी, ७७ एसटी जागांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी आयोगाने खर्चााची मर्यादाही निश्चित केली आहे. त्यानुसार, अ वर्ग मनपासाठी १५ लाख रुपये, ब वर्ग मनपासाठी १३ लाख, क वर्ग मनपासाठी ११ लाख, तर ड वर्ग मनपासाठी ९ लाख इतका असणार आहे. आजपासून मनपा निवडणूक क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.

अधिक वाचा  काँग्रेसमधील बड्या नेत्याचा अजितदादांना फोन; या महापालिकेत एकत्र लढायचं का? कार्यकर्त्यांनी 238 मतदारसंघात… दादांचं हे मत

कुठं कुठं होणार निवडणूक?

  • अहिल्यानगर महानगरपालिका
  • अकोला महानगरपालिका
  • अमरावती महानगरपालिका
  • भिवंडी निजामपूर महानगरपालिका
  • बृहन्मुंबई महानगरपालिका
  • चंद्रपूर महानगरपालिका
  • छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
  • धुळे महानगरपालिका
  • इचलकरंजी महानगरपालिका
  • जळगाव महानगरपालिका
  • जालना महानगरपालिका
  • कल्याण डोंबिवली महानगरपालिका
  • कोल्हापूर महानगरपालिका
  • लातूर महानगरपालिका
  • मालेगाव महानगरपालिका
  • मीरा भाईंदर महानगरपालिका
  • नागपूर महानगरपालिका
  • नांदेड वाघाळा महानगरपालिका
  • नाशिक महानगरपालिका
  • नवी मुंबई महानगरपालिका
  • पनवेल महानगरपालिका
  • परभणी महानगरपालिका
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका
  • पुणे महानगरपालिका
  • सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका
  • सोलापूर महानगरपालिका
  • ठाणे महानगरपालिका
  • उल्हासनगर महानगरपालिका
  • वसई विरार महानगरपालिका