अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी 5 नोव्हेंबर रोजी निवडणुका पार पडल्या. उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ही लढत होत आहे. मतदान जरी आज पार पडत असले तरी निकाल येण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. मतमोजणी सध्या सुरू आहे. दोन्हीही उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर होते. आता कमला हॅरिस यांनी दमदार वापसी केली होती. मात्र नंतर ट्रम्प यांनी बहुमताचा आकडा गाठला आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरेकिचे 47 वे राष्ट्रपती बनणार आहेत. हाती आलेल्या कलांनुसार ट्रम्प यांनी 277 जागांवर आघाडी घेतली आहे.






राष्ट्राध्यक्ष निवडणुकांमध्ये मतदान आणि मतमोजणीत कमला हॅरिस यांनी दमदार वापसी केली आहे. तर, यामुळं डोनाल्ड ट्रम्प यांची लीड कमी होताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये कमला हॅरिस या पिछाडीवर गेल्या होत्या. मात्र जसजसी मतमोजणी होत गेली कमला हॅरिस यांनी मतांची कसर भरुन काढली आहे. त्यामुळं व्हाइट हाउसवर कोणाची सत्ता येणार, याची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने अमेरिकन सिनेटमध्ये बहुमताचा आकडा गाठला आहे.
डोनाल्ड ट्रम्प 267 जागांवर आघाडीवर होते. तर, कमला हॅरिस यांनीही 216 जागांवर आघाडी घेतली आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 538 इलेक्टोरल कॉलेजमधून 270 इलेक्टोरल कॉलेजची मत मिळवणे गरजेचे होते. आता मतमोजणीनुसार, कमला हॅरिस या 226 जागांवर तर ट्रम्प 277 जागांवर आघाडीवर आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्या अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. तर, नवीन राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी जानेवारी 2025 मध्ये होणार आहे.
सात राज्यांकडे सत्तेची चावी?
अमेरिकेत 50 राज्य आहेत. मात्र त्यापैकी 7 अशी स्विंग स्टेट आहेत ज्यांच्याकडे सत्तेची चावी आहे. 50 राज्यांपैकी बरीचशी राज्य प्रत्येक निवडणुकीत एकाच पक्षाला मत देतात. फक्त या सात राज्यांव्यतिरिक्त. त्यामुळं निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाणाऱ्या या राज्यांना स्विंग स्टेट असं म्हणतात. या राज्यांमध्ये मतमोजणीचे चित्र बदलू शकते. त्यामुळं अमेरिकेती सर्व सात राज्यांचे लक्ष्य या सात राज्यांमध्ये होणाऱ्या विजयावर अधिक असते. व्हाइट हाउसमध्ये कोणाची सत्ता येणार हे या सात स्विंग राज्यात होणाऱ्या विजयावर अवलंबून असते.
सात राज्य कोणती?
एरिजोना, जॉर्जिया, मिशिगन, नेवादा, उत्तर कॅरोलिना, पेन्सिल्वेनिया आणि विस्कॉन्सिन यांचा समावेश आहे. सुरुवातीच्या कलांनुसार, या सात राज्यांपैकी सहा राज्यात डोनाल्ड ट्रम्प यांना आघाडी मिळत असल्याचे पाहायला मिळतेय. तर, सातवं राज्य नेवादची मतमोजणी अद्याप समोर आलेली नाहीये.
या सात स्विंग स्टेटमध्ये सर्वाधिक 19 इलेक्टोरल कॉलेज वोट पेन्सिल्वेनियाकडे आहेत. त्या व्यतिरिक्त मिशिगन (10), जॉर्जिया (16), विस्कॉन्सिन (10), नॉर्थ कॅरोलिना (16), एरिजोना (6) आणि विस्कॉन्सिनकडे 11 इलेक्टोरल कॉलेज आहेत.











