कर्वेनगर मोरया मित्र मंडळाचे वेगळेपण; बालकांनी दिला दिपोत्सवातून VOTE for Better Maharashtraचा संदेश

0
1

मोरया मित्र मंडळ कर्वेनगर वतीने दरवर्षी दिवाळी मध्ये दिपोत्सव साजरा केला जातो. यावर्षी आज दिपोत्सव साजरा करण्यात आला. ह्या दिपोत्सवामध्ये ऐश्वर्या जाधव, दिव्या दानवले, संचिता काळे, नेत्रा नायकवडी, स्वरा पडवळ यांनी रांगोळी साकरली होती. रांगोळीच्या माध्यमातून मतदानाबाबत जनजागृती व्हावी म्हणून मतदानाचे बोध चिन्ह साकारुन मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य, चांगले शिक्षण, चांगले आरोग्य,चांगला रोजगार, महिला सुरक्षितता या साठी मतदान करा VOTE for Better Maharashtra असा उल्लेख करुन रांगोळी भोवती ५०१ दिव्यांची आरास करून दिपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या समोर कॉग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष विजय खळदकर मंडळाचे संस्थापक केदार वसंत मारणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून दिपोत्सवला सुरवात केली. यावेळी मोरया मंडळाचे अध्यक्ष रोहिदास जाधव,उपाध्यक्ष रोहित दानवले, कार्याध्यक्ष अक्षय केसवड,ऋषीकेश जगताप,गणेश शिंदे,सुरेखा जोशी,पोर्णिमा केसवड, सुशीला नालगुडे, सोनाली मारणे, रेणुका जावळे, स्वाती दारवटकर आणि मंडळाचे सभासद उपस्थित होते.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे संस्थापक केदार वसंत मारणे यांनी केले होते. यावेळी मारणे म्हणाले मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. माझ्या एका मताने काय होणार? हा विचार सुद्धा मनातुन काढुन टाका, एका मताने खूप फरक पडतो. *मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे* आपला महाराष्ट्र,आपलं कुटुंब ,आपला समाज महगाई, बेरोजगारी, गुन्हेगारी,यांच्यापासून सुरक्षित ठेवायचा आहे म्हणून मतदान करा.
चांगले शिक्षण, रोजगार, आरोग्य, महिला सुरक्षितता यासाठी १००% मतदान करा. सर्वांनी आपला हक्क बजावला पाहिजे म्हणून असा उपक्रम आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने राबवत आहोत असे मारणे म्हणाले.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार